सोलापूरात जुगार आड्यांवर धाड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांवर कारवाई

By admin | Published: March 25, 2017 12:47 PM2017-03-25T12:47:12+5:302017-03-25T12:47:12+5:30

सोलापूरात जुगार आड्यांवर धाड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांवर कारवाई

Action on 12 people, seizure of goods and jewelery worth lakhs of rupees; | सोलापूरात जुगार आड्यांवर धाड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांवर कारवाई

सोलापूरात जुगार आड्यांवर धाड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांवर कारवाई

Next

सोलापूरात जुगार आड्यांवर धाड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांवर कारवाई
सोलापूर : कळमण (ता़ उ़ सोलापूर) येथील जुगार आड्यावर धाड टाकून १ लाख ११ हजार रु चा मुद्देमाल पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीम पोलिसांंनी जप्त करून १२ आरोपींना ताब्यात घेतले़
दरम्यान, पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांचे आदेशान्वये सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कळमण (ता उत्तर सोलापूर) येथील जि.प शाळेच्या पाठीमागे पञाशेडमध्ये बालाजी गैवर्धन पैकेकर हा चालवत असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्यावर धाड टाकली़ याप्रकरणी मनमत भगवान यादव, अर्जून जगन्नाथ कांबळे, राजाभाऊ गोरख नागाळे, आण्णा भारत लंबे, इनूस गुलाब शेख, रामू राजाराम पवार, वैजिनाथ महादेव पैकेकरी, देविदास विश्वनाथ क्षिरसागर,बाळू पांडूरंग तुपसमूंदर, तानाजी गणपत लंबे, पांडूरंग गोवर्धन लंबे, मैनोद्दीन आब्बास शेख यांना १२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १ लाख ११ हजार ५३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या प्रसंगी पोलीस अधीक्षक विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील स.पो.नि प्रकाश वाघमारे, पोना अमृत खेडकर, अंकूश मोरे, मिलिंद कांबळे, पो.कॉ प्रवीण पाटील, अमोल माने, अभिजीत ठाणेकर, बाळराजे घाडगे, पांडूरंग केंद्रे, अमोल जाधव, स्वप्नील गायकवाड यांच्या टिमने हे काम केले आहे.

Web Title: Action on 12 people, seizure of goods and jewelery worth lakhs of rupees;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.