बाल दिंडीला जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, गुणापवाडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:11 PM2023-06-29T22:11:02+5:302023-06-29T22:12:23+5:30

सोलापूर : बाल दिंडीला जाण्यासाठी पित्याने दुचाकी दिली नाही म्हणून रागाच्या भरात एका १४ वर्षीय मुलाने साडीने जांभळाच्या झाडाच्या ...

A child committed suicide by hanging himself because he was not given a bike to go to Bal Dindi, an incident in Gunapawadi | बाल दिंडीला जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, गुणापवाडीतील घटना

बाल दिंडीला जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, गुणापवाडीतील घटना

googlenewsNext

सोलापूर : बाल दिंडीला जाण्यासाठी पित्याने दुचाकी दिली नाही म्हणून रागाच्या भरात एका १४ वर्षीय मुलाने साडीने जांभळाच्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सांगोला तालुक्यात सर्वसामान्यातून हळहळ व्यक्त झाली.

यश राजेंद्र काळे (वय १४, रा. गुणापवाडी, ता. सांगोला) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून गुरुवार, २९ जून २०२३ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास सांगोला तालुक्यात गुणापवाडी येथे ही घटना घडली. याबाबत पांडुरंग विठोबा वाघमोडे (रा.गुणापवाडी, ता. सांगोला) यांनी पोलिसात खबर दिली आहे.

यश काळे हा (रा. बेवनूर, ता. जत) येथील एका हायस्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकत होता. गुरुवार, २९ जून रोजी त्याच्या हायस्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली होती. या दिंडीला जाण्यासाठी त्याने वडिलांकडे दुचाकी मागितली. त्यावेळी वडिलांनी त्यास मला पंढरपूर वारीला जायचे आहे म्हणत मोटरसायकल देण्यास नकार दिला. त्यानंतर वडील पंढरपूरला निघून गेले अन यशने रागाच्या भरात घराच्या पाठीमागे डोंगराच्या पायथ्याशी जाऊन जांभळीच्या झाडाच्या फांद्यीला साडीने गळफास घेतला. दरम्यान त्या परिसरातील मेंढपाळांना तो झाडाच्या फांदील लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 

त्यांनी यशच्या घरी आईशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने त्याला दुचाकीवरून सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वी मरण पावल्याचे घोषीत केले.
 

Web Title: A child committed suicide by hanging himself because he was not given a bike to go to Bal Dindi, an incident in Gunapawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.