सोलापूर जिल्ह्यात ‘मिसमॅच’च्या यादीतील ८० हजार शेतकरी कर्जमाफीला अपात्र, तालुकास्तरीय समितीने केली तपासणी, पात्र ठरले फक्त ४० हजार खातेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:19 PM2018-02-16T16:19:53+5:302018-02-16T16:21:02+5:30

‘मिसमॅच’ च्या एक लाख २१ हजार ९०७ वर गेलेल्या खातेदारांच्या तालुकास्तरीय समितीच्या तपासणीत ७९ हजार ६९४ खातेदार अपात्र झाले आहेत.

80 thousand farmers in the list of 'Mismatch' in Solapur district disqualified, taluka level committee examined, only 40 thousand account holders were eligible | सोलापूर जिल्ह्यात ‘मिसमॅच’च्या यादीतील ८० हजार शेतकरी कर्जमाफीला अपात्र, तालुकास्तरीय समितीने केली तपासणी, पात्र ठरले फक्त ४० हजार खातेदार

सोलापूर जिल्ह्यात ‘मिसमॅच’च्या यादीतील ८० हजार शेतकरी कर्जमाफीला अपात्र, तालुकास्तरीय समितीने केली तपासणी, पात्र ठरले फक्त ४० हजार खातेदार

googlenewsNext
ठळक मुद्देपात्र झालेल्या ४० हजार ६९३ पैकी कर्जमाफीच्या यादीत किती शेतकरी येणार?छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान कर्जमाफी योजनेसाठी शेतकºयांच्या आतापर्यंत तीन प्रकारच्या याद्या बँकांना दिल्या आहेत.सहकार खात्यावर कर्जमाफीचा पडलेला ताण काहीअंशी तरी कमी झाला आहे. 


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ :  ‘मिसमॅच’ च्या एक लाख २१ हजार ९०७ वर गेलेल्या खातेदारांच्या तालुकास्तरीय समितीच्या तपासणीत ७९ हजार ६९४ खातेदार अपात्र झाले आहेत. पात्र झालेल्या ४० हजार ६९३ पैकी कर्जमाफीच्या यादीत किती शेतकरी येणार?, हे आता शासनाच्या निकषावर अवलंबून आहे. 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान कर्जमाफी योजनेसाठी शेतकºयांच्या आतापर्यंत तीन प्रकारच्या याद्या बँकांना दिल्या आहेत. ग्रीन, यलो व मिसमॅच अशा तीन याद्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. ग्रीन व यलो यादीची तपासणी होऊन पात्र व अपात्र यादीही बँकांनी शासनाला पाठवली आहे. शेवटची ‘मिसमॅच’ यादी बँकांना दिली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या ७५ हजार २२ शेतकºयांची  यादी तालुकास्तरीय समितीने तपासणी पूर्ण केली असता ३३ हजार २२६ खातेदार पात्र तर ४१ हजार ६५२ शेतकरी अपात्र झाले आहेत. राष्टÑीय बँकांच्या ४६ हजार ८८५ खातेदारांच्या तपासणीत ७ हजार ४६७ पात्र तर ३८ हजार ४२ शेतकरी अपात्र झाले आहेत. 
अपात्र झालेल्या खातेदारांचे पुढे काय?, याचा निर्णय शासन स्तरावर झालेला नाही; मात्र पात्र झालेल्यांपैकी किती खातेदारांची नावे कर्जमाफीच्या यादीत येणार?, याकडेही लक्ष लागले आहे. कारण ‘ मिसमॅच’ यादीही खातेदारांची असून शासनाच्या निकषात कुटुंब गृहीत धरुन कर्जमाफी दिली जाते. त्यामुळे यापूर्वी एखाद्या कुटुंबातील किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव यापूर्वी ग्रीन व यलो यादऊ यादीत पात्र झालेल्यांचे नाव कर्जमाफीला पात्र राहणार नाही. यामुळे पात्र झालेल्यांपैकी अनेकांची नावे कर्जमाफीच्या यादीतून बाहेर पडणार आहेत. 
---------------------
सहकार खात्याचा ताण कमी
- कर्जमाफीच्या सर्व प्रकारच्या याद्या सहकार खात्याने तपासणी करुन बँकांना व शासनाला पाठविल्या असून पात्र झालेल्यांसाठी शासनाकडून पैसे आल्यानंतर बँकांना पुढील काम करावे लागणार आहे. सहकार खात्यावर कर्जमाफीचा पडलेला ताण काहीअंशी तरी कमी झाला आहे. 

Web Title: 80 thousand farmers in the list of 'Mismatch' in Solapur district disqualified, taluka level committee examined, only 40 thousand account holders were eligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.