निरादेवघर धरणात ३५ टक्के पाणी ; गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के साठा कमी

By दिपक दुपारगुडे | Published: March 30, 2024 06:24 PM2024-03-30T18:24:20+5:302024-03-30T18:24:51+5:30

वीर धरणातून निरा डाव्या कालव्यात ८२७ क्युसेकने तर निरा उजव्या कालव्यातून १,५५० क्युसेकने पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडण्यात येत आहे.

35 percent water in Niradevghar Dam; 15 percent less stock compared to last year | निरादेवघर धरणात ३५ टक्के पाणी ; गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के साठा कमी

निरादेवघर धरणात ३५ टक्के पाणी ; गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के साठा कमी

दीपक दुपारगुडे 

सोलापूर : ब्रिटिशकालीन भाटघर धरणात ३३ टक्के, तर निरादेवघर धरणात ३५.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के पाणीसाठा कमी आहे. भाटघर धरणातून १९८७ क्युसेकने तर निरादेवघर धरणातून ७५० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. सध्या दोन्ही धरणांतून २,७४० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

भाटघर धरणाची क्षमता ३४ टीएमसी तसेच निरादेवघर धरणाची क्षमता ११.९१ टीएमसी पाणीसाठा याप्रमाणे आहे. ही दोन्ही धरणे गतवर्षी १०० टक्के भरली होती. मागील वर्षी या कालावधीत भाटघरमध्ये ४२ टक्के तर निरादेवघर धरणात ५५.३५ टक्के पाणीसाठा होता. त्यानुसार यावेळी भाटघर धरणात १० टक्के तर निरादेवघर धराणात १५ टक्के पाणीसाठा कमी आहे. वीर धरणात सध्या ४५.४० टक्के तर गुंजवणी धरणात ४४.२३ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी याच कालावधीत वीर धरणात ६३.८८ टक्के तर गुंजवणी धरणात ६०.२७ टक्के पाणीसाठा होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही धरणांत १८ टक्के पाणीसाठा कमी आहे.

पाणीटंचाईची शक्यता...

वीर धरणातून निरा डाव्या कालव्यात ८२७ क्युसेकने तर निरा उजव्या कालव्यातून १,५५० क्युसेकने पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडण्यात येत आहे. दोन्ही कालव्यांतून फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या पूर्वेकडील तालुक्यांना पाणी सोडण्यात येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच धरणांत सरासरी २० टक्के पाणीसाठा कमी असून, सध्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो असाच कायम राहिल्यास पुढील अडीच महिन्यांत धरणे रिकामी होऊन पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकेल.

Web Title: 35 percent water in Niradevghar Dam; 15 percent less stock compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.