श्राद्धाच्या जेवणातून हिरोळी गावातील ३५ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:30 PM2019-07-15T14:30:09+5:302019-07-15T14:31:29+5:30

सोलापुरातील १२ जणांसह अक्कलकोटमधील पाहुण्यांचा समावेश

35 people from Hiroli village get poisoning from Shraddha's meal | श्राद्धाच्या जेवणातून हिरोळी गावातील ३५ जणांना विषबाधा

श्राद्धाच्या जेवणातून हिरोळी गावातील ३५ जणांना विषबाधा

Next
ठळक मुद्देहिरोळी येथे कार्यक्रम झाल्यानंतर रात्री जेवण झाले, दुसºया दिवशी सर्व पाहुणे आपापल्या गावी निघून गेलेसोलापुरातील नातेवाईक सकाळी हिरोळी येथून निघाले, अन्न भरपूर राहिल्याने त्यांनी जेवण सोबत घेतलेजेवण गरम केल्यानंतर सर्वांनी पुन्हा सामूहिक जेवण केले. काही तासातच सर्वांना अचानक उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला

सोलापूर : गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यात हिरोळी या गावी श्राद्धाच्या कार्यक्रमानंतर दुसºया दिवशी पाहुण्यांनी शिळे अन्न खाल्ल्याने सुमारे पस्तीस जणांना विषबाधा झाली. हा प्रकार शनिवारी व रविवारी घडला. 

रफिक अहमद लंगडे (वय २५), बेगम सिकंदर मुजावर (वय ६५), शाहीर सिकंदर मुजावर (वय २५), सादिक हुसेनबाशा मुजावर (वय १८), खैरून रफिक लंगडे (वय २३), सत्तार रजाक लंगडे (वय ३५), निलोफर अल्लाउद्दीन लंगडे (वय १४), लतिफ अहमद लंगडे (वय २२), मुस्ताक हुसेन मुजावर (वय १५), फारुख अन्वर पटेल (वय १५, सर्व रा. शोभादेवी नगर, सोलापूर) या रुग्णांना उपचारासाठी शनिवारी दुपारी २.१५ वाजता शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अहमद मौलासाब लंगडे (वय ४७, रा. हिरोळी, ता. आळंद, जि. गुलबर्गा) यांना उपचारासाठी शेजारी राहणारे मौलाली मकानदार व हुसेन मुजावर यांनी शनिवारी दुपारी २.१५ वाजता तर काहींना रात्री १0.१५ वाजता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. 

याच कार्यक्रमातील प्यारनबी हनीफ लंगडे (वय ६०), जिलानी हनीफ लंगडे (वय ४५), जुबेदा जिलानी लंगडे (वय ११), मुस्कान रज्जाक लंगडे (वय १५, सर्व रा. हिरोळी, ता. आळंद, जि. गुलबर्गा), चाँद घुडूभाई खडकाळे (वय ५२), सोहेल चाँद खडकाळे (वय ५0, सर्व रा. देशमुख बोरगांव, ता. अक्कलकोट) यांना गुलाब मुजावर व मुबारक खडकाळे यांनी रविवारी सकाळी ११.१५ वाजता दाखल केले आहे.
सर्व मंडळी नातेवाईकाचा अंत्यविधी झाल्यानंतर चाळीसाव्या दिवशी होणाºया श्राद्धाच्या कार्यक्रमाला आळंद तालुक्यातील हिरोळी येथील घरी आले होते. १२ जुलै रोजी कार्यक्रम झाला, सर्व मंडळींचे जेवण झाले. दुसºया दिवशी सकाळी सोलापुरातील नातेवाईकांनी डब्यात अन्न घेतले व सोलापूरला आले. शोभादेवी नगरातील घरात सर्वांनी मिळून आणलेले शिळे अन्न गरम करून जेवण केले. काही तासातच सर्वांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. 

सर्व पाहुण्यांना एकसारखा त्रास
- हिरोळी येथे कार्यक्रम झाल्यानंतर रात्री जेवण झाले. दुसºया दिवशी सर्व पाहुणे आपापल्या गावी निघून गेले. सोलापुरातील नातेवाईक सकाळी हिरोळी येथून निघाले, अन्न भरपूर राहिल्याने त्यांनी जेवण सोबत घेतले. हे जेवण सोलापुरातील शोभादेवी नगर येथील राहत्या घरी आले. जेवण गरम केल्यानंतर सर्वांनी पुन्हा सामूहिक जेवण केले. काही तासातच सर्वांना अचानक उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. जसा त्रास सोलापुरात सुरू झाला तसा तो हिरोळी (ता. आळंद, जि.गुलबर्गा) येथील नातेवाईकांना देखील होऊ लागला. सर्वांना त्रास जास्त होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: 35 people from Hiroli village get poisoning from Shraddha's meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.