30 thousand 9 lacs outstanding to 2.55 lakh consumers in Solapur district, MSEDCL's campaign against electricity bill defaulters soon | सोलापूर जिल्ह्यात २़१५ लाख ग्राहकांकडे ३०२९ लाख रूपयांची थकबाकी, वीजबिल थकबाकीदारांविरोधात महावितरणची धडक मोहीम लवकरच
सोलापूर जिल्ह्यात २़१५ लाख ग्राहकांकडे ३०२९ लाख रूपयांची थकबाकी, वीजबिल थकबाकीदारांविरोधात महावितरणची धडक मोहीम लवकरच

ठळक मुद्देसद्यस्थितीत वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे जिल्ह्यातील २ लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदार वीजग्राहकांकडे ३० कोटी २९ लाख रुपयांची थकबाकीवीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरू राहणार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : जिल्ह्यातील २ लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदार वीजग्राहकांकडील ३० कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी पूर्णपणे वसूल करण्यासाठी महावितरणच्या वतीने पुन्हा एकदा धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. 
        या मोहिमेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ११०० अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी जुनी मिल कंपाउंडमधील 'बिजली भवन' येथे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
        यावेळी प्रादेशिक संचालक ताकसांडे म्हणाले की, सद्यस्थितीत वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शून्य थकबाकी मोहिमेत गेल्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये तसे चांगले काम झाले. परंतु फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण थकबाकी वसूल करण्याच्या ध्येयानेच काम करणे आवश्यक आहे व थकबाकी असल्यास वीजपुरवठा खंडितच होणार असा संदेश या मोहिमेद्वारे थकबाकीदारांना द्यावा. ही मोहीम  आक्रमकपणे राबविली गेली पाहिजे व थकबाकी पूर्णपणे या फेब्रुवारी महिन्यातच वसूल झाली पाहिजे, असे निर्देशही ताकसांडे यांनी यावेळी दिले. यासोबतच सर्व अधिकारी व जनमित्रांनी वीजबिलांचे अचूक रीडिंग घेऊन ग्राहकांना वीजवापराचे योग्य बिल मिळेल यासाठी उपाययोजना कराव्यात. यात हयगय करणाºया रीडिंग एजन्सीजविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी मनोगतामध्ये सोलापूर वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त करण्याचे आवाहन केले.  थकबाकी वसुली मोहिमेवर निघालेल्या अभियंता, जनमित्रांनी प्रादेशिक संचालक ताकसांडे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत थकबाकी वसुलीचा निर्धार केला. 
         जिल्ह्यातील २ लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदार वीजग्राहकांकडे ३० कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. आक्रमकपणे सुरू झालेल्या थकबाकी वसुली मोहिमेत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांचे प्रमुख अभियंते, लेखा अधिकारी तसेच हजारो जनमित्र सहभागी झाले आहेत. 
        वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलांचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रिकनेक्शन चार्जेस भरून वीजपुरवठा सुरु करून घ्यावा लागणार आहे. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध तात्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
        थकीत वीजबिलांचा संबंधित ग्राहकांनी तात्काळ भरणा करावा अन्यथा वीजपुरवठा खंडितच केला जाणार आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केंद्रे तसेच घरबसल्या 'आॅनलाईन' पेमेंटसाठी महावितरणची  वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.
----------------------
वीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरू राहणार
थकबाकी व चालू वीजबिलांचा ग्राहकांना भरणा करता यावा म्हणून महावितरणची जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे दि.१०, ११ व १३ फेब्रुवारी रोजी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. थकीत देयकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी शनिवारी (दि.१०), रविवारी (दि. ११) व मंगळवारी (दि. १३) सार्वजनिक सुटी असली तरी जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.
 


Web Title: 30 thousand 9 lacs outstanding to 2.55 lakh consumers in Solapur district, MSEDCL's campaign against electricity bill defaulters soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.