253 polling stations for 64 Gram Panchayats in Solapur district, ready for district administration! | सोलापूर जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी २५३ केंद्रांवर मतदान, जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण !

ठळक मुद्दे२७ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे१ लाख ५५ हजार ८८७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार या निवडणुकीतही थेट जनतेतून सरपंच निवडण्यात येणार प्रशासकीय यंत्रणेने मतदान आणि मतमोजणीची तयारी सुरू केली


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २१ : जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २६ डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ६४ ग्रामपंचायतीचे ६४ सरपंच आणि ६५० सदस्यांसाठी २५३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. 
जिल्ह्यातील टेंभुर्णी, माळीनगरसह ६४ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीतही थेट जनतेतून सरपंच निवडण्यात येणार आहे. गावागावात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणेने मतदान आणि मतमोजणीची तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकताच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. प्रशासकीय यंत्रणेने कामात कुचराई करू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. २७ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 
------------------------
एकूण १ लाख ५५ हजार ८८७ मतदार
४६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण १ लाख ५५ हजार ८८७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ७३ हजार १७१ स्त्रियांचा तर ८२ हजार ७१६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. 
------------------
येथे होणार मतमोजणी
या ग्रामपंचायतीची मतमोजणी २७ डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. करमाळा : तहसील कार्यालय आवार, माढा : शासकीय धान्य गोदाम, बार्शी : शासकीय धान्य गोदाम उपळाई रोड, पंढरपूर : शासकीय धान्य गोदाम, माळशिरस : तहसील कार्यालय, सांगोला : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन, मंगळवेढा : शासकीय धान्य गोदाम क्र. ५, दक्षिण सोलापूर : तहसील कार्यालय आवार, अक्कलकोट : तहसील कार्यालय
---------------------
६३ निवडणूक निर्णय अधिकारी
६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ६३ निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर २८ क्षेत्रिय अधिकारी, २८४ मतदान केंद्राध्यक्ष, २८४ मतदान अधिकारी, ५६८ इतर मतदान अधिकारी, २९२ शिपाई, ११८६ इतर अधिकारी, कर्मचारी आणि २९९ पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


Web Title: 253 polling stations for 64 Gram Panchayats in Solapur district, ready for district administration!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.