सोलापूर जिल्हा बँकेच्या २३२६ शेतकºयांनी भरले १९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:35 PM2018-07-07T12:35:11+5:302018-07-07T12:37:00+5:30

जिल्हा बँक: एकरकमी परतफेड योजनेतून बँकेला मिळाले १०२ कोटी

23 crore farmers of Solapur district bank filled 19 crores | सोलापूर जिल्हा बँकेच्या २३२६ शेतकºयांनी भरले १९ कोटी

सोलापूर जिल्हा बँकेच्या २३२६ शेतकºयांनी भरले १९ कोटी

Next
ठळक मुद्देशासनाकडून थकबाकीदार १०,८२७ शेतकरी दीड लाखावरील भरलेली रक्कम व शासनाकडून जमा द्राक्षासारखे पीक नसताना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप

सोलापूर : दीड लाखावरील रक्कम भरा व कर्जमुक्त व्हा असा संदेश शेतकºयांपर्यंत गेल्याने मागील जून महिन्यात २३२६ शेतकºयांनी कर्जापोटी १९ कोटी २४ लाख ६५ हजार ३५६ रुपये भरल्याने शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेंतर्गत २५ कोटी ९१ लाख ६४ हजार ६५५ रुपये कर्ज खात्यावर जमा केले आहेत. एक रकमी परतफेड योजनेतून जिल्हा बँकेला आतापर्यंत १०२ कोटी १४ लाख ८५ हजार ८४० रुपये मिळाले असल्याचे सांगण्यात आले.

मागील वर्षी २४ जून रोजी राज्य शासनाने राज्यातील शेतकºयांचे दीड लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. दीड लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या सर्वच शेतकºयांचे कर्ज शासनाने भरले असून दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरणाºया शेतकºयांच्या खात्यावर शासन दीड लाख रुपये जमा करीत आहे. सोलापूर जिल्हा बँकेचे दीड लाखावरील कर्जदार १७ हजार २७३ इतके शेतकरी ‘ग्रीन’ यादीत आले आहेत. यापैकी ३० जूनअखेर ६ हजार ४४६ शेतकºयांनी दीड लाखावरील ४४ कोटी ५० लाख ५९ हजार ३२२ रुपये कर्ज खात्यावर जमा केले आहेत.

शासनाने दीड लाखाप्रमाणे ७७ कोटी २७ लाख ४० हजार ३४८ रुपये जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकºयांच्या खात्यावर जमा केले असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. शेतकºयांनी  दीड लाखावरील भरलेली रक्कम व शासनाकडून जमा झालेली रक्कम अशी १०२ कोटी १४ लाख ८५ हजार ८४०  रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेला मिळाली आहे. 

एकरकमी परतफेड योजनेंतर्गत दीड लाखावरील रक्कम भरण्यास वेग आला तो जिल्हा बँकेने नव्याने कर्ज देण्याची हमी दिल्यानंतर. प्रशासक अविनाश देशमुख यांनी दीड लाखावरील रक्कम भरणाºयांना पुन्हा पीक पाहून कर्ज देण्यास सुरुवात केल्याने जून या एकाच महिन्यात २३२६ शेतकºयांनी १९ कोटी २४ लाख ६५ हजार ३५६ रुपये कर्ज खात्यावर भरले आहेत. 

शासनाकडून थकबाकीदार १०,८२७ शेतकरी 
- दीड लाखावरील थकबाकीदार कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या ‘ग्रीन’ यादीतील १० हजार ८२७ शेतकºयांनी अद्यापही दीड लाखावरील रक्कम भरलेली नाही. या शेतकºयांनी १६९ कोटी ९१ लाख ९६ हजार २४५ रुपये भरल्यानंतर त्यांच्या खात्यावर ९२ कोटी ६६ लाख ६७ हजार ६५० रुपये शासन जमा करणार आहे. यापैकी बहुतेक शेतकरी हे मोठे बागायतदार म्हणून कर्ज दिलेले आहेत. अनेकांना क्षेत्र कमी असताना व द्राक्षासारखे पीक नसताना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केले आहे.दीड लाखाप्रमाणे २५ कोटी ९१ लाख ६४ हजार ६५५ रुपये कर्ज खात्यावर जमा झाले आहेत.  

शासनाने दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. शेतकºयांनी दीड लाखावरील कर्ज तत्काळ भरावे व नव्याने कर्ज घेऊन कर्जमुक्त व्हावे. पीक पाहून कर्ज दिले जाईल. 
- अविनाश देशमुख,
प्रशासक, जिल्हा बँक

Web Title: 23 crore farmers of Solapur district bank filled 19 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.