सोलापूर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी २०६ मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:50 AM2018-09-18T10:50:23+5:302018-09-18T10:51:26+5:30

११३३ कर्मचारी : पोलिसांचा चोख बंदोबस्त

206 polling stations for 61 gram panchayats in Solapur district | सोलापूर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी २०६ मतदान केंद्रे

सोलापूर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी २०६ मतदान केंद्रे

Next
ठळक मुद्दे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी  २६ सप्टेंबर रोजी मतदान २०६ मतदान केंद्रांवर ६० पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा बदोबस्त

सोलापूर : जिल्ह्यातील आॅक्टोबर महिन्यात मुदत संपणाºया ६१ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी २६ सप्टेंबर रोजी २०६ केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी १ हजार १३३ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे.

करमाळा तालुक्यातील २ ग्रामपंचायतींसाठी ६ केंद्रांवर मतदान तर माढा तालुक्यातील २ ग्रामपंचायतींसाठी ९ केंद्रांवर मतदान होत आहे. बार्शी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींकरिता १० केंद्रांवर, मोहोळमधील ४ ग्रामपंचायतींसाठी १३ केंद्रांवर, पंढरपूर तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींसाठी १५ केंद्रांवर, माळशिरस तालुक्यातील ९ ग्रामपंचायत्साठी ३७ केंद्रांवर, सांगोला तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींसाठी १९ केंद्रांवर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींसाठी १९ केंद्रांवर, अक्कलकोट तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी ४० केंद्रांवर मतदान होणार आहे. या २०६ मतदान केंद्रांवर ६० पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा बदोबस्त असणार आहे.

 मतदानासाठी स्थानिक सुट्टी
 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी  २६ सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, अशा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

संवेदनशील १३ मतदान केंद्रे
 बार्शी तालुक्यातील सुर्डी, माळशिरस तालुक्यातील पिलीव आणि सुळेवाडी, मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी, हुन्नूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे, अक्कलकोट तालुक्यातील तळेवाड, धारसंग, केगाव बु., म्हैसलगी, कुडल, केगाव ख., कल्लकर्जाळ अशी १३ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. 

Web Title: 206 polling stations for 61 gram panchayats in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.