'या मुलीशी लग्न करणारा होईल श्रीमंत', लोकांनी अंधविश्वासाच्या नादात व्हायरल केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:27 AM2024-03-22T10:27:32+5:302024-03-22T10:27:45+5:30

इथे एका मुलीचा फोटो व्हायरल झालाय आणि त्यावरून वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. 

Woman told by many online user that her face will help husband get rich | 'या मुलीशी लग्न करणारा होईल श्रीमंत', लोकांनी अंधविश्वासाच्या नादात व्हायरल केला फोटो

'या मुलीशी लग्न करणारा होईल श्रीमंत', लोकांनी अंधविश्वासाच्या नादात व्हायरल केला फोटो

जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींबाबत आपापल्या काही धारणा असतात. काही गोष्टी कुठे शुभ मानलं तर त्याच गोष्टींना कुठे अशुभ मानलं जातं. अनेक गोष्टींबाबत अंधविश्वास लोकांच्या मनात भरलेला असतो. अशीच एक अजब मान्यता चीनमधून समोर आली आहे. इथे एका मुलीचा फोटो व्हायरल झालाय आणि त्यावरून वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. 

इथे या मुलीचं सुंदर दिसणं अंधविश्वासासोबत जोडण्यात आलं आहे. त्यामुळे तिची चर्चा होत आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, या मुलीने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असाव, ज्यानंतर ती व्हायरल झाली. कारण तिचा चेहरा चीनी मान्यतांनुसार सौभाग्यशाली असून तो समृद्धी आणणारा आहे.

या तरूणीचा फोटो चीनमधील वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाला आहे. या तरूणीचं वय 29 असून ती हेनान प्रांतातील राहणारी आहे. तिच्या व्हिडिओला 5 लाख 70 हजार व्ह्यूज मिळाले असून हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. लोकांची मान्यता आहे की, अशाप्रकारचा चेहरा असणाऱ्या मुली पतीच्या आयुष्या संपत्ती आणि समृद्धी आणतात. त्यांच्या पतीला मैत्री करण्यात मदत मिळते आणि त्यांच्याकडे संपत्तीही येते.

चेहऱ्यात काय आहे खास

चीनमध्ये वांग फु शियांग म्हणजे सौभाग्यशाली चेहऱ्याच्या काही खासियत सांगितल्या जातात. मोठं कपाळ आणि गोल चेहऱ्यासोबतच गोल हनुवटी असलेल्या मुली दयाळु असतात आणि त्या पतीला मित्र बनवण्यात मदत करतात. इतकंच नाही तर यांचं नाक समोरून गोल आणि सरळ लांब असतं. खालचं ओठ थोडं जाड असतं. डोळे चमकदार आणि केस मुलायम असलेल्या मुली समृद्धी आणतात. लोकांनी या अंधविश्वासामुळे तरूणीला आदर्श पत्नी म्हणून व्हायरल केलं आहे.

Web Title: Woman told by many online user that her face will help husband get rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.