Viral Ferrari Video: साडेचार कोटींची फरारी, ड्रायव्हरनं पार्किंमधल्या गाड्यांना ठोकली; पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:20 PM2022-06-03T13:20:35+5:302022-06-03T13:20:56+5:30

Viral Ferrari Video: एका व्यक्तीने जगातील सर्वात महागडी फेरारी ठोकल्याची घटना घडली आहे. यात गाडीचा अक्षरशः चुरा झाला.

Viral Ferrari Video: Ferrari worth Rs 4.5 crore, driver hits cars in parking | Viral Ferrari Video: साडेचार कोटींची फरारी, ड्रायव्हरनं पार्किंमधल्या गाड्यांना ठोकली; पुढे...

Viral Ferrari Video: साडेचार कोटींची फरारी, ड्रायव्हरनं पार्किंमधल्या गाड्यांना ठोकली; पुढे...

Next

Viral Ferrari News: आपल्यापैकी बहुतांश लोकांनी फेरारी गाडीबद्दल ऐकलं असेल. प्रत्यक्षात या गाडीला पाहण्याचे अनेकांचे स्वप्न असेल, पण भारतातही फार क्वचित लोकांकडे ही गाडी आहे. या गाडीची कोट्यवधी रुपये किंमत असल्याने ती सगळ्यांना परवडू शकत नाही. दरम्यान, एका व्यक्तीने त्याची कोट्यवधी रुपयांची फेरारी गाडी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर धडकावल्याची घटना घडली आहे. 

अतिशय वेगात होती गाडी
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ब्रिटनमधील आहे. हा अपघात 25 मे रोजी झाला. फेरारी SF90 Stradale ही जगातील सर्वात महागडी कार आहे. कारच्या ड्रायव्हरने ही 4.8 कोटी रुपये किमतीची कार पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये ठोकली. हा अपघात इतका भीषण होता की, कोट्यवधी रुपयांच्या फेरारीचे खूप नुकसान झाले.

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. फेरारीचा वेग किती होता, हे अद्याप कळू शकलेले नाही. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी 6.5 सेकंदात 124mph च्या वेगाने धावते. याचा टॉप स्पीड 211mph आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून कार चालकालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 

Web Title: Viral Ferrari Video: Ferrari worth Rs 4.5 crore, driver hits cars in parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.