VIDEO : कुत्र्याला अचानक रस्त्यात आला हार्ट अटॅक, व्यक्तीने तोंडाने श्वास देऊन वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 11:35 AM2024-04-18T11:35:41+5:302024-04-18T11:36:13+5:30

Viral Video : यावेळी एका व्यक्तीने जराही वेळ न घालवता या कुत्र्याला मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी जे केलं त्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

Man saves dog giving CPR by mouth video goes viral | VIDEO : कुत्र्याला अचानक रस्त्यात आला हार्ट अटॅक, व्यक्तीने तोंडाने श्वास देऊन वाचवला जीव

VIDEO : कुत्र्याला अचानक रस्त्यात आला हार्ट अटॅक, व्यक्तीने तोंडाने श्वास देऊन वाचवला जीव

Viral Video : पाळीव प्राण्यांमध्ये सगळ्यात प्रामाणिक प्राणी कुत्रा मानला जातो. हा प्राणी खूप समजदार समजला जातो. अनेक परिस्थितींमध्ये ते आपल्या मालकाचा जीव वाचवतात. मालकही त्यांना आपल्या अपत्यासारखा जीव लावतात. त्यामुळेच जास्तीत जास्त लोक कुत्रा पाळतात. काही लोकांना या जीवासोबत इतका लडा लागतो की, तेही या प्राण्यांची खूप काळजी घेतात. 

हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे. ज्यात एका कुत्र्याला रस्त्यात चालता फिरता हार्ट अटॅक आला होता. यावेळी एका व्यक्तीने जराही वेळ न घालवता या कुत्र्याला मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी जे केलं त्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे. या व्यक्तीला लोक थेट देवदूत म्हणून लागले. कारण त्याने जे केलं ते सगळ्यांनाच जमेल असं नाही.

तोंडाने दिला श्वास

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती रस्त्यात आजारी पडलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. त्याला हार्ट अटॅक आला होता. बराच प्रयत्न करूनही कुत्रा काही हालचाल करत नव्हता. अशात व्यक्तीने आपल्या तोंडाने कुत्र्याला श्वास दिला. त्याने जे केलं त्याचा फायदाही झाला. कुत्र्याने हालचाल केली. काही वेळाने तो उभाही झाला.

हा व्हिडीओ rundawggym नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 2.3 मिलियन म्हणजे 23 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 13 हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. इतकंच नाही तर लोक या व्हिडीओवर कमेंट्स करून या व्यक्तीचं कौतुक करत आहेत. 

Web Title: Man saves dog giving CPR by mouth video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.