१३०० फूट उंचीवर आकाशात साजरा करत होती १८वा बर्थडे आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 03:14 PM2019-03-28T15:14:17+5:302019-03-28T15:24:58+5:30

कधी कधी लोक उत्साहाच्या भरात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना हे काहीतरी वेगळं करणं चांगलंच महागात पडतं.

Girl celebrating 18th birthday plunges 1300ft to death along with skydiving instructor | १३०० फूट उंचीवर आकाशात साजरा करत होती १८वा बर्थडे आणि...

१३०० फूट उंचीवर आकाशात साजरा करत होती १८वा बर्थडे आणि...

Next

(Image Credit : dailymail.co.uk)

कधी कधी लोक उत्साहाच्या भरात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना हे काहीतरी वेगळं करणं चांगलंच महागात पडतं. असंच काहीसं मेक्सिकोतील १८ वर्षीय वेनेसा इवोन मेलेंडेज कार्डेनाससोबत झालं. 

रविवारी ती तिचा १८वा वाढदिवस साजरा करत होती. यावेळी तिने निर्णय घेतला की, ती १३०० फूट उंचीहून उडी घेऊन वाढदिवस साजरा करणार. त्यासाठी तिने स्कायडायव्हिंगचा प्लॅन केला. वेनेसाने तिच्या मार्गदर्शकासोबत १३०० फूट उंचीवरून उडी घेतली सुद्धा, पण एक अपघात झाला आणि वेनेसासोबतच मार्गदर्शकाचाही यात मृत्यू झालाय.

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यात दोन्ही पॅराशूट जमिनीवर येताना दिसत आहेत. पण दोघांचाही याच मृत्यू झाला आहे. वेनेसा ही हायस्कूलमध्ये शिकत होती. तिच्यासोबत मरण पावलेल्या मार्गदर्शकाचं वय ३४ आहे. प्रशासनाला दोघांचेही मृतदेह हायवे शेजारील झुडपांमध्ये आढळले. 

स्कायडायव्हिंगची सेवा देणाऱ्या मेक्सिकन कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांच्या उपकरणांमध्ये कोणताही बिघाड नाही. अल्बट्रॉस पॅराशूटींगचे डायरेक्टर जॉर्ज गॅटन म्हणाले की, ही घटना फार दुखद आहे. पण पॅराशूट फेल झालं असं काही घडलं नाही. हे विमानात प्रवास करताना आणि रिलीज मेकॅनिजम अ‍ॅक्टिवेट करण्यामुळे होऊ शकतं. 

स्कायडायव्हिंग कंपनी ग्राहकांना इन्शुरन्स देत नाही. कारण याला एक्सट्रीम स्पोर्ट वर्गात धरलं जातं. त्यामुळे इन्शुरन्स मिळणं कठिण आहे. सध्या या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. 

Web Title: Girl celebrating 18th birthday plunges 1300ft to death along with skydiving instructor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.