कर्णधार क्लार्क बाद झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या ९ धावांची गरज होती. स्टिव्हन स्मिथने चौकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. स्मिथने नाबाद ५६ धावांची खेळी केली.शेवटचा एकदिवसीय सामना खेळणा-या कर्णधार मायकल क्लार्कने स्टिव्हन स्मिथसोबत तिस-या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. क्लार्कने शानदार ७४ धावांची खेळी करत संघाला विजयाच्या समीप नेले.डेव्हिड वॉर्नर ४५ धावांवर असताना बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती २ बाद ६३ अशी झाली होती.विश्वविजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. अॅरोन फिंचला ट्रेंट बोल्टने शून्यावरच माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियाची स्थिती १ बाद २ धावा अशी होती.ग्रँट एलियट ८३ धावांवर असताना झेलबाद झाला. जेम्स फॉल्कनरने त्याची विकेट घेतली. फॉल्कनरने सामन्यात ९ षटकांमध्ये ३६ धावा देऊन ३ विकेट घेतल्या. या कामगिरीसाठी फॉल्कनरला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.रॉंची व कोरी अँडरसन शून्यावर बाद झाले. तर डेनियल व्हिटोरी ९ धावांवर असताना मिशेल जॉन्सनने त्याला बाद केले. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ७ बाद १६७ अशी झाली. मिशेल जॉन्सनने सामन्यात ९ षटकांत ३० धावा देऊन ३ विकेट घेतल्या.लागोपाठ तीन धक्के बसल्यावर ग्रँट एलियट व रॉस टेलर या जोडीने चौथ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. रॉस टेलर ४० धावांवर बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची स्थिती ४ बाद १५० अशी होती.वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा फटकणारा मार्टिन गुप्टिल या सामन्यात अपयशी ठरला. गुप्टिल अवघ्या १५ धावांवर बाद झाला.वर्ल्डकप फायनलमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या न्यूझीलंडला पहिल्याच षटकांत धक्का बसला. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये संघाला धडाकेबाज सुरुवात करुन देणारा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम मिशेल स्टार्कच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.रविवारी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर सात विकेट्सनी मात करत विश्वविजेतेपद पटकावले. फायनलमधील सामन्याचा घेतलेला हा आढावा...