धबधब्यावरच्या दरडीचे दगड अचानक खाली आल्याने दोन युवक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 10:03 PM2017-09-10T22:03:39+5:302017-09-10T22:03:50+5:30

जोरदार पडत असलेल्या पावसामुळे मुख्य धबधब्यावरच्या दरडीचे दगड अचानक खाली आल्याने दोन युवक जखमी झाले. त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जखमींमध्ये प्रदीपकुमार भाऊसाहेब पाटील (३५) व अवधूत महादेव शिंदे (३२, दोघे रा. निपाणी-बेळगाव) येथील आहेत.

Two youths injured due to the sudden collapse of the watercourse | धबधब्यावरच्या दरडीचे दगड अचानक खाली आल्याने दोन युवक जखमी

धबधब्यावरच्या दरडीचे दगड अचानक खाली आल्याने दोन युवक जखमी

Next


सावंतवाडी, दि. 10 - जोरदार पडत असलेल्या पावसामुळे मुख्य धबधब्यावरच्या दरडीचे दगड अचानक खाली आल्याने दोन युवक जखमी झाले. त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जखमींमध्ये प्रदीपकुमार भाऊसाहेब पाटील (३५) व अवधूत महादेव शिंदे (३२, दोघे रा. निपाणी-बेळगाव) येथील आहेत.

रविवार असल्याने आंबोलीत पर्यटकांची मोठी गर्दी असते. आजही मोठ्या प्रमाणात पर्यटक आंबोली परिसरात आले होते. सकाळपासूनच पर्यटकांची मोठी वर्दळ होती. सकाळी आंबोलीत पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक पर्यटकांनी धबधब्याचा आनंद लुटला. मात्र सायंकाळच्या सुमारास आंबोलीत पावसाचा जोर वाढला होता. आंबोलीत ज्या पद्धतीने पाऊस कोसळत होता, तसाच तो चौकूळ परिसरातही कोसळत होता.

त्यामुळे आंबोलीच्या मुख्य धबधब्यावर असलेले दरडीचे दोन दगड सरळ खाली आले आणि आंघोळ करीत असलेल्या पर्यटकांच्या डोक्यात पडले. यात प्रदीपकुमार भाऊसाहेब पाटील  व अवधूत महादेव शिंदे हे दोघेही जखमी झाले आहेत. या दोघांच्या डोक्यात दगड पडल्याचे बघून स्थानिक पर्यटकांनी त्यांना प्रथम आंबोली येथील रुग्णालयानंतर सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे त्यांना दाखल करण्यात आले आहे. उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, या घटनेबाबत पोलिसात कोणतीही नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Two youths injured due to the sudden collapse of the watercourse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.