तिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:50 PM2019-05-13T12:50:55+5:302019-05-13T12:51:58+5:30

संपूर्ण गोवा राज्याची तहान भागविणाऱ्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी व घरादारांचा त्याग केला, त्यांच्यावरच आता पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली या धरणग्रस्तांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी केला.

Tilari will take water for dams; Warning to the Tahsildars of the villagers | तिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारा

तिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारा

Next
ठळक मुद्देतिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारास्वाभिमानच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी घेतला आक्रमक पवित्रा

दोडामार्ग : संपूर्ण गोवा राज्याची तहान भागविणाऱ्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी व घरादारांचा त्याग केला, त्यांच्यावरच आता पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली या धरणग्रस्तांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी केला.

दोडामार्ग तालुक्यात महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारी धरण साकारले आहे. या तिलारीच्या पाण्यावर गोव्याची तहान भागविली जाते. मात्र, ज्यांच्या त्यागावर हे धरण उभे आहे, त्या शिरंगे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या खानयाळे पुनर्वसन गावठणातील (बोडण) धरणग्रस्तांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. भीषण पाणीटंचाईला इथल्या ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी धरणग्रस्तांमधून केली जात होती. मात्र प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली.

परिणामी महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. यावेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संतोष नानचे, बोडण सरपंच मनीषा नाईक, साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, तालुका उपाध्यक्ष संतोष नाईक, एकनाथ नाडकर्णी, शिक्षण व आरोग्य सभापती मनीषा देवी आदी उपस्थित होत्या.

यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी यांना नानचे यांनी राज्य सरकारने पाणीटंचाईच्या कामाला मुदतवाढ मिळाली असून, तालुका पातळीवर पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याची बाब लक्षात आणून दिली. तसेच टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली. तर धरणग्रस्तांना शासनाने पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून न दिल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला.

छायाचित्रास प्रतिबंध

यावेळी तहसीलदार यांना शिरंगे धरणग्रस्त व बोडण ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर करण्यासंबंधित मागणी करणारे निवेदन दिले. मात्र, त्याचे छायाचित्र घेण्यास पत्रकारांना तहसीलदार ओंकार ओतारी यांनी प्रतिबंध केला. आचारसंहितेचे कारण यावेळी त्यांनी पुढे केले.

Web Title: Tilari will take water for dams; Warning to the Tahsildars of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.