सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गातील जनतेला फक्त आश्वासने देवून फसविले, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Published: September 15, 2023 03:42 PM2023-09-15T15:42:35+5:302023-09-15T15:42:57+5:30

..तेव्हा श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणारे आता कोठे गेले?

The rulers deceived the people of Sindhudurga by giving only promises, Criticism of MNS leader Parashuram Uparkar | सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गातील जनतेला फक्त आश्वासने देवून फसविले, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र

सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गातील जनतेला फक्त आश्वासने देवून फसविले, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र

googlenewsNext

कणकवली: मागील १५ वर्षे सर्व सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला फक्त विविध आश्वासने देवून सातत्याने फसवले आहे. विकासाच्या फक्त मोठ्मोठया वलग्नाच करण्यात आल्याची टीका मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपरकर म्हणाले, चिपी विमानतळाच्या श्रेयासाठी पुढे पुढे करणारे आणि आपसात भांडणारे अनेक राजकीय नेते होते. तर अनधिकृतरित्या विमान उडवून एका  माजी पालकमंत्र्यांनी आणि केंद्रीय उद्योगमंत्र्यांनीही स्वतः श्रेय घेण्यासाठी चढाओढ केली. सध्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही गणेशोत्सवात चिपी वरून नियमित विमानसेवा सुरू राहील हे फसवे आश्वासन दिले. मात्र, विमान सेवा ठप्प झाल्यावर तेव्हा श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणारे आता कोठे गेले?

सध्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण असो किंवा खासदार विनायक राऊत अथवा स्थानिक आमदार या सर्वांनी जनतेची फसवणूक केली आहे. पालकमंत्र्यांनी गणेशोत्सवापूर्वी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर आच्छादन घालण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. त्यामुळे गणेशचतुर्थीला रेल्वेने येणारे गणेशभक्त पावसात भिजत गावी पोहोचणार आहेत. तसेच सुशोभीकरणाचे कामही सुरू झालेले नाही. भाजप जिल्हाध्यक्षानी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी  २० कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. त्यानिमित्ताने त्यांनी रस्ते खड्डेयुक्त असल्याचे मान्य केले. जिल्ह्यातील ठेकेदारांनी केलेल्या कामांची ७० ते८० कोटी रुपये देणे बाकी आहे. त्यामुळे  विकासाच्या गप्पा मारणारे जनतेला फसवत आहेत.

महामार्गाची एक लेन जरी चालू केली असली तरी अन्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात बांधकाम विभाग प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता दिसून येते. मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हयात शासकीय रुग्णालयात डॉक्टर नाहीत, गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत नाही. याकडे कोणीच पाहत नाहीत. त्यामुळे पालकमंत्री हे कशासाठी आहेत? फक्त स्वतःच्या विकासासाठी आहेत का? असा प्रश्न पडतो. जिल्ह्याच्या दृष्टीने विचार करता पालकमंत्री आणि शिक्षण मंत्री हे दोन्ही निष्क्रिय ठरले असल्याची टीकाही त्यांनी केली.

Web Title: The rulers deceived the people of Sindhudurga by giving only promises, Criticism of MNS leader Parashuram Uparkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.