व्हेलच्या उलटीसंदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा - रविकिरण तोरसकर 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 3, 2024 04:50 PM2024-04-03T16:50:31+5:302024-04-03T16:50:50+5:30

मच्छीमारांवरील अन्याय खपवून घेणार नाही

Stop the blatant harassment of fishermen over whale vomit says Ravikiran Toraskar | व्हेलच्या उलटीसंदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा - रविकिरण तोरसकर 

व्हेलच्या उलटीसंदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा - रविकिरण तोरसकर 

संदीप बोडवे

मालवण : दोन आठवड्यांपूर्वी व्हेल माशाची उलटीच्या तस्करीसंदर्भात मच्छीमारांना होणारा त्रास थांबविण्यात यावा, अशी मागणी भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

मालवण किनारपट्टीवरून चार संशयितांना सांगली-मिरज पोलिसांनी अटक केली होती. यावेळी १९ कोटी रुपयांची १९ किलो उलटी संशयितांकडून जप्त करण्यात आली, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला, तसेच किनारपट्टीवरील व मालवण शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबांची नावे घेऊन संशयित यांची एक मोठी यादी सांगली-मिरज पोलिसांनी बनविली आहे, अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे, तसेच काही महिलांना या प्रकरणात गुंतवून पोलिस यंत्रणा चुकीच्या प्रकारे तपास करत आहेत. तसेच, तपासादरम्यान काही मच्छीमारांना मारहाण केल्याचे वृत्त हाती आले आहे.

मच्छीमारांवरील अन्याय खपवून घेणार नाही

संबंधित विषयात पोलिस मच्छीमार समाजाला नाहक त्रास देत असून, पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने चालला आहे. त्यामुळे काही मच्छीमार कुटुंब अटकेच्या भीतीने परागंदा झाली आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमार समाजाला होणाऱ्या या त्रासाची गंभीर दखल सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टी, मच्छीमार सेल यांनी घेतली असून, बुधवारी कुडाळ येथील बैठकीत या विषयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे लक्ष घालून हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहे. मच्छीमार समाजावर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

Web Title: Stop the blatant harassment of fishermen over whale vomit says Ravikiran Toraskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.