सावंतवाडी पर्यटन महोत्सवासाठी खास कक्ष : बबन साळगावकर ,कार्यक्रमांची मिळणार माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:50 PM2017-12-15T22:50:30+5:302017-12-15T22:50:43+5:30

सावंतवाडी : यावर्षी पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना वेगळेपण दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 Special cell for Sawantwadi tourism festival: Baban Salgaonkar will get programs | सावंतवाडी पर्यटन महोत्सवासाठी खास कक्ष : बबन साळगावकर ,कार्यक्रमांची मिळणार माहिती

सावंतवाडी पर्यटन महोत्सवासाठी खास कक्ष : बबन साळगावकर ,कार्यक्रमांची मिळणार माहिती

Next

सावंतवाडी : यावर्षी पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना वेगळेपण दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. संयुक्त दशावतार, सुरमयी वाद्यवृंद, असे दर्जेदार कार्यक्रम नागरिंकांच्या पसंतीला उतरणार असून, महोत्सवाबाबत यावर्षी प्रथमच खास कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षातूनच महोत्सवाचे नियोजन होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

सावंतवाडीत होणाºया पर्यटन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पालिकेत खास कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य व क्रीडा सभापती आनंद नेवगी, नगरसेवक बाबू कुडतरकर, मनोज नाईक, अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, सुरेंद्र बांदेकर, दीपाली भालेकर, दीपाली सावंत, भारती मोरे उपस्थित होते.
साळगावकर म्हणाले, गेली ११ वर्ष पर्यटन महोत्सव सुरू आहे.

यामध्ये शहरवासियांचा मोठा सहभाग असतो. नागरिकांच्या समस्या तसेच त्यांना महोत्सवाबाबत माहिती हवी असल्यास ती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी खास कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षातून सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचेल. तेथे एक कर्मचारी महोत्सव होईपर्यंत थांबेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महोत्सवात १९८ स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुधवार पासून महोत्सवासाठी स्टॉल बुकिंग सुरू करण्यात आले आहे. स्टॉल बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्टॉलच्या विक्रीला प्रचंड प्रतिसाद
नगरपालिकेने १९८ स्टॉल विक्रीसाठी काढले होते. त्यातील जवळपास दोन दिवसांत १३० स्टॉल विकले गेले आहेत. मुंबई, पुणे, तसेच अन्य भागातूनही स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवाच्या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात नागरिक स्टॉलला तसेच महोत्सवाला भेटी देत असतात. त्यामुळेच हा प्रतिसाद मिळतो, असे नगराध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले.

Web Title:  Special cell for Sawantwadi tourism festival: Baban Salgaonkar will get programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.