सिंधुदुर्ग : निरंजन डावखरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:12 PM2018-06-06T12:12:04+5:302018-06-06T12:12:04+5:30

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजप-रिपब्लिकन पक्ष आघाडीच्या वतीने माजी आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांचा गुरुवारी (दि. 7) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

Sindhudurg: Niranjan Davkhare will file his nomination papers tomorrow | सिंधुदुर्ग : निरंजन डावखरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

सिंधुदुर्ग : निरंजन डावखरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

Next
ठळक मुद्दे निरंजन डावखरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणारकोकण भवनमध्ये हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित

सिंधुदुर्ग : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजप-रिपब्लिकन पक्ष आघाडीच्या वतीने माजी आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांचा गुरुवारी (दि. 7) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज भरण्यावेळी भाजप-रिपब्लिकन पक्ष आघाडीच्या मित्र पक्षांच्या लोकप्रतिनिधींबरोबरच हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व अ‍ॅड. निरंजन डावखरे करीत होते. गेल्या सहा वर्षांच्या काळात त्यांनी कोकणातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच पदवीधर मतदारांचे प्रश्न मांडले होते. त्यातील अनेक प्रश्न सुटले असून, काही मार्गी लागत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील स्थानिक पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून अ‍ॅड. डावखरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी डावखरे यांचे स्वागत केले. तसेच त्यांची विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी शिफारस केली होती.

गेल्या दहा -बारा दिवसांपासून माजी आमदार अ‍ॅड. डावखरे यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांना कार्यकर्त्यांबरोबरच पदवीधर मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोकण विभागीय आयुक्तांच्या कोकण भवन (बेलापूर) येथील कार्यालयात अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्याकडून गुरुवारी (ता. 7) सकाळी साडेदहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या वेळी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Sindhudurg: Niranjan Davkhare will file his nomination papers tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.