सिंधुदुर्ग : गुंडशाही नेस्तनाबूत करण्यासाठी एकसंघ होण्याची गरज : श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:08 PM2018-09-15T15:08:27+5:302018-09-15T15:12:52+5:30

कट्टर हिंदुत्व विचारसरणी अंगीकारून धर्माच्या नावाखाली गुंडशाही करणाऱ्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व घटकांनी एकसंघ होऊन नवी विचारसरणी आचरणात आणायला हवी, असे प्रतिपादन गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी येथे आयोजित धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी परिषदेत केले.

 Sindhudurg: Need to be united to destroy Gundshahi: Sripatrao Shinde | सिंधुदुर्ग : गुंडशाही नेस्तनाबूत करण्यासाठी एकसंघ होण्याची गरज : श्रीपतराव शिंदे

दहशतवाद व असहिष्णुता विरोधी परिषदेत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी विचार मांडले. यावेळी बबन साळगावकर, संपत देसाई, आनंद मेणसे, संदीप निंबाळकर आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे सिंधुदुर्ग : गुंडशाही नेस्तनाबूत करण्यासाठी एकसंघ होण्याची गरज : श्रीपतराव शिंदे सावंतवाडी येथील धार्मिक दहशतवाद, असहिष्णुता विरोधी परिषदेत मार्गदर्शन

सावंतवाडी : कट्टर हिंदुत्व विचारसरणी अंगीकारून धर्माच्या नावाखाली गुंडशाही करणाऱ्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व घटकांनी एकसंघ होऊन नवी विचारसरणी आचरणात आणायला हवी, असे प्रतिपादन गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी येथे आयोजित धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी परिषदेत केले.

पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रात दहशत व अराजकता निर्माण करू पाहणार्‍या शक्तींना कायमचा पायबंद घालण्याची वेळ आली आहे, असा विचार उपस्थितांनी व्यक्त केला. या परिषदेला कॉ. संपत देसाई, सत्यशोधक आंदोलनाचे अंकुश कदम, नगराध्यक्ष बबन साळगावकर, आनंद मेणसे, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, महेश परुळेकर, संजय वेतुरेकर, लीलाधर घाडी आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, राजकीय क्षेत्रात हुकूमशाही आली की कष्टकरी जनतेला अच्छे दिन कसे येतील? आज वाढते पेट्रोल दर व अन्य समस्या भेडसावत आहेत. हत्या होत आहेत. मात्र, अशा विषयांवर देशभ्रमंती करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांना ब्र देखील का काढता येत नाही? हेच का त्यांचे अच्छे दिन? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संपत देसाई म्हणाले, दहशत माजवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होण्याचे हे दिवस भयानक आहेत. यासाठी सर्वांनी एक होऊन लढा दिला पाहिजे. अन्यथा ही दहशत वाढतच जाईल. नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, सावंतवाडी सुसंस्कृत शहर आहे. येथे झालेल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनासाठी गोविंद पानसरे या नगरीत आले होते. त्यावेळच्या व अन्य चळवळीत सहभाग असलेल्या लेखकाच्या पाठीशी सर्वांनी रहायला हवे. कारण एकजूट असेल तरच असे प्रकार रोखता येतील.

अंकुश कदम यांनी धर्माच्या नावाखाली जे काही चालले आहे, ते घातक असून आज लेखक, कवी यांच्यावर हल्ले होत आहेत. हे आपल्या देशाला भूषणावह नाही. राज्यकर्त्यांनी त्यांना संरक्षण द्यायला हवे, असे मत व्यक्त केले.

यावेळी संजय वेतुरेकर, प्रा. सुमेधा नाईक, डॉ. गोविंद काजरेकर, वीरधवल परब, राजेश मोंडकर, लीलाधार घाडी यांनी मनोगत मांडले. यावेळी रमेश बोंदे्र, बाळ बोर्डेकर, डॉ. जी. ए. बुवा, शशी नेवगी, नितीन वाळके, नंदू पाटील, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, प्रभाकर भागवत, प्रा. विजय फातर्पेकर, विठ्ठल कदम, अमोल कदम, राजेंद्र्र कांबळे, प्रकाश तेंडोलकर, आनंद परुळेकर, मधुकर मातोंडकर, प्रज्ञाकुमार गाथाडे, जयंत बरेगार, सिद्धार्थ तांबे, विजय ठाकर, महेश पेडणेकर, रवींद्र्र संकपाळ, रामदास जाधव, अनिल सरमळकर, प्रा. रुपेश पाटील, शिवाजी वांद्र्रे, योगेश संकपाळ, उषा परब, अ‍ॅड. प्रकाश परब, डॉ. शरयू आसोलकर, अनिता सडवेलकर, महाश्वेता कुबल, समीर बेग उपस्थित होते.

यावेळी मारेकर्‍याच्या हिटलिस्टवर असणार्‍या साहित्यिकाच्या मनोगताचे वाचन नंदू पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश परुळेकर, प्रास्ताविक अ‍ॅड. संदीप निंबाळकर यांनी केले. हा धार्मिक दहशतवाद राज्यकर्त्यांच्या हुकूमशाहीमुळे चालला आहे. हा दहशतवाद निर्माण करू पाहत आहे. अशा प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी लढा द्यायला हवा, असा निर्णय घेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेट देत निवेदन दिले.

हिटलिस्टवर असलेल्या लेखकाचे मनोगत

हिटलिस्टवर असलेल्या लेखक प्राध्यापकाने आपले मनोगत परिषदेत पाठविले होते. त्याचे वाचन नंदू पाटील यांनी केले. लेखकाने म्हटले आहे की, लेखकाला हवे ते लिहिता येऊ नये असा हा काळ आहे. या काळात आपल्यातल्या एखाद्या लेखकाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होतो. सर्व जण सैरभैर होतात, मुळात विखुरलेले असलेले सबबी सांगत आणखी दूर जातात. ही गोष्ट आपल्या मध्यमवर्गीय मानसिकतेला साजेशीच आहे. पण या अशा वेळीच आपली वैचारिकता, भूमिकेतील ठामपणा, मानसिक कणखरपणा यांची कसोटी लागत असते.

मराठी लेखक अन्य भाषिक लेखकांच्या तुलनेत या बाबतीत कमी पडतो, हे आणीबाणीसह अनेक प्रसंगांतून दिसून आले आहे. एखादा दुर्गा भागवतांसारखा अपवाद वगळता बहुसंख्य लेखकांनी आपल्या सुरक्षित कवचात राहणे पसंत केले आहे. पु. ल. देशपांडे, दळवी, आ. ना. पेडणेकर, तुलशी परब, नेमाडे, जयंत पवार अशांनी भाषण वा प्रासंगिक लेखन यामधून सडेतोड भूमिका घेतली आहे. आज या गोष्टींचीच गरज आहे.

 

Web Title:  Sindhudurg: Need to be united to destroy Gundshahi: Sripatrao Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.