‘ऑलिव्ह रिडले’ जातीच्या कासव तोंडात अडकला गळ, वायंगणी येथील कासवमित्रांनी दिले जीवदान

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 5, 2024 03:42 PM2024-04-05T15:42:36+5:302024-04-05T15:43:11+5:30

सावळाराम भराडकर वेंगुर्ला : वायंगणी समुद्रकिनारी ‘ऑलिव्ह रिडले’ जातीचे कासव तोंडात स्टीलचा मोठा गळ अडकलेल्या स्थितीत आढळले. येथील कासवमित्र ...

'Olive Ridley' Tortoise with throat stuck in its mouth, Kasavamitra from Wayangani gave his life | ‘ऑलिव्ह रिडले’ जातीच्या कासव तोंडात अडकला गळ, वायंगणी येथील कासवमित्रांनी दिले जीवदान

‘ऑलिव्ह रिडले’ जातीच्या कासव तोंडात अडकला गळ, वायंगणी येथील कासवमित्रांनी दिले जीवदान

सावळाराम भराडकर

वेंगुर्ला : वायंगणी समुद्रकिनारी ‘ऑलिव्ह रिडले’ जातीचे कासव तोंडात स्टीलचा मोठा गळ अडकलेल्या स्थितीत आढळले. येथील कासवमित्र सुहास तोरसकर, जयानंद तोरसकर व जितेंद्र पेंडुरकर कुटुंबीय यांनी या जखमी कासवाच्या तोंडातून तो गळ शर्थीच्या प्रयत्नांनंतर अलगद काढून प्राथमिक उपचार करून कासवाला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले.

वायंगणी - हुलमेख वाडी समुद्रकिनारी ४ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास दुर्मिळ ऑलिव्ह रिडले मादी कासव समुद्रकिनारी अंडी लावून जात असताना या मादी कासवाच्या वेगळ्या हालचालीवरून तिचे मोबाइल टॉर्चद्वारे निरीक्षण केले असता, या कासवाच्या तोंडात व नाकात एक मोठा स्टीलचा गळ अडकलेल्या स्थितीत दिसून आला.

वायंगणी येथील कासवमित्र सुहास तोरसकर, जयानंद तोसरकर आणि जितेंद्र पेंडुरकर कुटुंबीय यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांतून कासवाच्या तोंडात व नाकात अडकलेला स्टीलचा मोठा गळ अलगद काढून त्या कासवावर प्राथमिक उपचार करून नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले. गेली ३० वर्षे कासवमित्र सुहास तोरसकर आणि मित्रमंडळ यांनी जाळ्यात अडकलेल्या कासवांना, जखमी कासवांना, जखमी समुद्री पक्षी यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले आहे. त्यांचे हे काम अविरतपणे चालू आहे.

Web Title: 'Olive Ridley' Tortoise with throat stuck in its mouth, Kasavamitra from Wayangani gave his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.