सिंधुदुर्गनगरीत मुख आरोग्य शिबीरात ७० लाभार्थींची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:04 PM2017-12-08T12:04:32+5:302017-12-08T12:20:31+5:30

सिंधुदुर्गनगरी  येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित मुख आरोग्य तपासणी शिबीराचा ७० लाभार्थींनी लाभ घेतला. मुख आरोग्य, मुखाची स्वच्छता, तंबाखू, सिगरेट व्यसनापासून होणारी हानी, या बाबत समुपदेशनही यावेळी करण्यात आले.

Inspection of 70 beneficiaries in the main health camp in Sindhudurg Nagar | सिंधुदुर्गनगरीत मुख आरोग्य शिबीरात ७० लाभार्थींची तपासणी

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित मुख आरोग्य तपासणी शिबीराचा ७० लाभार्थींनी लाभ घेतला.

Next
ठळक मुद्देमहिला सफाई कामगार यांचे सामुहिक समुपदेशनतंबाखू, सिगरेट व्यसनापासून होणारी हानी या बाबत समुपदेशन

सिंधुदुर्गनगरी  - येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित मुख आरोग्य तपासणी शिबीराचा ७० लाभार्थींनी लाभ घेतला. मुख आरोग्य, मुखाची स्वच्छता, तंबाखू, सिगरेट व्यसनापासून होणारी हानी, या बाबत समुपदेशनही यावेळी करण्यात आले.

मुख्यालयातील महिला सफाई कामगार यांचे सामुहिक समुपदेशन यावेळी करण्यात आले. या शिबीरात तपासणीचे काम डॉ. पोर्णिमा ब्रिदे, डॉ. शौनक पाटील यांनी केले तर समुपदेशन आनंद परब यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते कार्मीस आलमेडा यांनी सहकार्य केले.

राज्यात आशा कार्यकर्ती आणि एएनएम यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरिकांपर्यंत जाऊन या मोहिमेसंदर्भात जाणीव जागृती केली जात आहे आणि त्यांची मौखिक आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यंत विभागा अंतर्गत आशा व एएनएमच्या माध्यमातून हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

राज्यात जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सामान्य रुग्णालय येथे नागरिकांनी स्वत: येऊन आरोग्य तपासणी करुन घेतली आहे. मोहिम सुरु झाल्यापासून हजारो रुग्णांची तपासणी झाली आहे.

Web Title: Inspection of 70 beneficiaries in the main health camp in Sindhudurg Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.