राज्यातील कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ -निरंजन डावखरे यांची मागणी मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 08:21 PM2019-07-04T20:21:37+5:302019-07-04T20:22:53+5:30

राज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणात रुग्णांना सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता वाढ

Increase in the honor of BAMS Doctor of Contract in the State | राज्यातील कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ -निरंजन डावखरे यांची मागणी मान्य

राज्यातील कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ -निरंजन डावखरे यांची मागणी मान्य

Next
ठळक मुद्देआदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना ४५, तर इतर भागातील डॉक्टरांना ४० हजार मानधन

सिंधुदुर्गनगरी, दि. ४ (प्रतिनिधी) : राज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणात रुग्णांना सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीवरून सार्वजनिक आरोग्य विभागाने आज शासन परिपत्रक जारी केले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २६ जून रोजी कंत्राटी डॉक्टरांच्या मानधन वाढीची मागणी केली होती. त्यावेळी या संदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी निरंजन डावखरे यांना दिले होते.

कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे, त्यांच्या जागी बीएएमएस पदवीधारक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प होते. एमबीबीएस कंत्राटी डॉक्टरांप्रमाणे बीएएमएस डॉक्टरांनाही `समान काम समान वेतन' या तत्वावर मानधन देण्याची आवश्यकता आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी आरोग्यमंत्रांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. राज्य सरकारने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (वर्ग अ) मानधनात वाढ केली आहे. त्यात एमबीबीएस डॉक्टरांचा उल्लेख आहे. मात्र, बीएएमएस डॉ्क्टरांचा उल्लेख केला नाही, याकडे आमदार डावखरे यांनी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले होते.

सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या आजच्या शासन परिपत्रकानुसार आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना ४५ हजार रुपये, तर इतर भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना ४० हजार एवढे मानधन मिळणार आहे. त्यामुळे कोकण विभागातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

Web Title: Increase in the honor of BAMS Doctor of Contract in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.