गडनदी पुलानजीक महामार्ग जोडरस्ता खचला, सुदैवाने दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 10:25 AM2019-06-22T10:25:11+5:302019-06-22T10:28:57+5:30

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण करत असताना दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कणकवली व वागदे गाव जोडणाऱ्या गडनदी पुलाच्या जोडरस्त्याचा भराव पावसामुळे २० फूट खचला आहे. मात्र, महामार्ग ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते.

Guadani Pulanjeet highway collapsed, fortunately the crash was avoided | गडनदी पुलानजीक महामार्ग जोडरस्ता खचला, सुदैवाने दुर्घटना टळली

गडनदी पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा भराव खचला.

Next
ठळक मुद्देठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्ष; ग्रामस्थांनी वाहतूक रोखलीप्रांताधिकारी, तहसीलदारांकडून घटनेची पाहणी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण करत असताना दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कणकवली व वागदे गाव जोडणाऱ्या गडनदी पुलाच्या जोडरस्त्याचा भराव पावसामुळे २० फूट खचला आहे. मात्र, महामार्ग ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते.

दरम्यान, जोडरस्त्याचा भराव खचल्याची बाब लक्षात येताच गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी धोकादायक रस्त्यावरून जाणारी वाहतूक रोखली. त्यावेळी प्रशासनाला जाग आली. तर मुजोर ठेकेदाराने पुन्हा भराव करून सुरक्षित काम करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रोखलेली वाहने एकेरी वाहतूक सुरू करून सोडण्यात आली. भराव खचल्याची बाब वेळीच लक्षात आल्याने सुदैवाने सावित्री पुलाच्या दुर्घटनेसारखी घटना टळली आहे.


खचलेल्या रस्त्यामुळे ग्रामस्थांनी वाहतूक रोखून ठेवली होती.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करत असताना कणकवली गडनदी पुलावर जुने पूल तोडून शेजारी नव्याने पूल उभारण्यात आले आहे. श्रीधर नाईक गार्डन ते हळवल हद्दीपर्यंत हे पूल उभारण्यात आले आहे.

या आरसीसी पुलाच्या भिंतीला जोडून मातीचा भराव करून जोडरस्ता बनविण्यात आला होता. वागदे गावच्या बाजूने असलेला हा जोडरस्ता पहिल्याच पावसात सुमारे २० फूट खोल खचला आहे. जर हा भराव मध्यरात्री अचानक खचला असता तर सावित्री पुलासारखी मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेबाबत प्रशासनाला सायंकाळी ४ वाजता माहिती मिळाली.

तहसीलदार संजय पावसकर त्यानंतर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ताबडतोब संबंधित ठेकेदाराला संपर्क साधला. तरी दोन तास त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महामार्गावर उतरत वाहने रोखून धरली.

गडनदीवरील एक पूल पूर्ण झाल्यानंतर त्यालगत जुन्या पुलाच्या जाग्यावर दुसरे पूल उभारण्यात येत आहे़. मधल्या दहा फुटांच्या गॅपमध्ये आरसीसी भिंत पुलाच्या उंचीने न उभारल्याने जोडरस्त्याचा भराव खचत गेला.

हा भराव बुधवारी सायंकाळपासून खचत होता. गुरूवारी दुपारपर्यंत हा भराव खचत मध्यरस्त्यापर्यंत आला. तरीही ठेकेदाराकडून केवळ बॅरल लावून ठेवण्यात आला होता. जाणीवपूर्वक या खचलेल्या भरावाकडे दिलीप बिल्डकॉनच्या अधिकारी व महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते.

तहसीलदारांच्या सुचनेनंतरही या कामाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यामुळे घटनास्थळी प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी आदी अधिकाºयांसह प्रशासकीय कर्मचारी दाखल झाले होते. तसेच ग्रामस्थांनी रस्ता रोखल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती.

घटनास्थळी महामार्ग ठेकेदार कंपनीचे अधिकारी येण्यास विलंब झाला. काही वेळाने साईट सुपरवायझर कौशिक खडदा त्या ठिकाणी आले. यावेळी स्वाभिमान पक्षाचे संदीप सावंत, कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, रूपेश आमडोसकर, पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थांनी कौशिक खडदा यांना चांगलेच धारेवर धरले.

लोकांचा जीव गेल्यावर खचलेला भराव दुरूस्त करणार का? लोकांच्या मरणाची वाट पाहता का? गंभीर घटना घडल्यास तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा नागरीकांनी यावेळी दिला संतप्त नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन पोलीस निरीक्षकांनी ह्यमी स्वत: उभा राहून हा रस्ता तयार करून घेतो. कोणीही काळजी करू नका. वाहतूक सुरळीत करूयात,ह्ण असे ग्रामस्थांना आवाहन केले़. त्याला प्रतिसाद देत रोखलेली वाहतूक सोडण्यात आली.

धोकादायक खचलेल्या भरावाच्या ठिकाणी काम करण्यास दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी त्यानंतर यंत्रणा लावली़ डंपरचा वापर करून त्या ठिकाणी नव्याने भराव करण्यात आला़ पोलीस प्रशासन व महसूल अधिकारी घटनास्थळी थांबले होते. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी खचलेल्या भरावाची डागडुजी करण्यात येत होती. गडनदी पुलावरून एकेरी वाहतूक करून हे काम करण्यात आले़.

कणकवलीत वाहतुकीची कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावर नव्याने तयार करण्यात आलेल्या गडनदी पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचताच वाहतूक रोखण्यात आली़ त्यामुळे वागदे व कणकवलीच्या बाजूने दुतर्फा सुमारे १ ते दीड किलोमीटर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या़.

कोल्हापूर-पणजी, पुणे-पणजी यासारख्या लांबपल्ल्याच्या बसेस वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या़. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस विश्वजीत परब, अनमोल रावराणे यांच्यासह पोलिसांचे पथक कार्यरत होते.


 

Web Title: Guadani Pulanjeet highway collapsed, fortunately the crash was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.