Sindhudurg: आंबेरी तपासणी नाक्यावर जिलेटीन कांड्या जप्त, दोघांवर गुन्हा दाखल 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 25, 2024 04:39 PM2024-03-25T16:39:38+5:302024-03-25T16:40:08+5:30

देवगड : देवगड तालुक्यातील आंबेरी चेकपोस्टवर लोकसभा निवडणुकीसाठी स्थायी सर्वेक्षण पथक यांनी रत्नगिरीकडून देवगडचा दिशेने येणारी आलिशान कारची तपासणी ...

Gelatin sticks seized at Amberi check post, case registered against two | Sindhudurg: आंबेरी तपासणी नाक्यावर जिलेटीन कांड्या जप्त, दोघांवर गुन्हा दाखल 

संग्रहित छाया

देवगड : देवगड तालुक्यातील आंबेरी चेकपोस्टवर लोकसभा निवडणुकीसाठी स्थायी सर्वेक्षण पथक यांनी रत्नगिरीकडून देवगडचा दिशेने येणारी आलिशान कारची तपासणी केली असता या गाडीमध्ये ३४ हजार किमतीचा २००० हजार जिलेटीनचा कांड्या आणि १३ हजार रुपये किमतीचे डीटोनेटर जप्त केले. गाडी सहित ७ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मुकेशकुमार लालूराम पवार आणि त्याचा सहकारी देवेंद्र सिंह रमनलाल राठोड (मूळ रा राजस्थान सध्या रा पाटगाव देवरूख) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

देवेंद्रसिंग रतनलाल राठोड (२६) राहणार भोपालगड भिलवडा (राजस्थान) व ड्रायव्हर मुकेशकुमार लालूराम पंवार रा. भिलवडा राजस्थान हे त्यांची कार (आरजे- ०६ युडी ०३७७) मधून तुळसणी तालुका संगमेश्वर (देवरुख) जिल्हा रत्नागिरी येथून त्याच्या वडिलांच्या मालकीच्या चार भुजा इंटरप्राईजेस या स्फोटक पदार्थाच्या गोडाऊन मधून २००० जलेटीनच्या जिवंत कांड्या किंमत ३४ हजार व एक हजार डेटोनेटर किंमत ११ हजार रुपये असे एकूण ४५००० रुपयांच्या स्फोटक पदार्थ ब्लास्टिंग ट्रॅक्टरला देण्यासाठी देवगडला निघाले होते. 

आंबेरी चेकपोस्टवर स्थायी सर्वेक्षण पथकाने संबंधित कारची तपासणी केली असता जिलेटीनचा कांड्या आढळल्या. बेकायदेशीर विनापरवाना जिलेटीन वाहतूक केल्याप्रकरणी मुकेशकुमार पवार आणि देवेंद्र सिंह राठोड या दोघांवर स्फोटक पदार्थ अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली.

Web Title: Gelatin sticks seized at Amberi check post, case registered against two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.