राधा कृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत गणेशकृपा तेंडोली मंडळ प्रथम, विविध संघांनी सादर केलेले कलाविष्कार लक्षवेधी 

By सुधीर राणे | Published: April 8, 2024 05:31 PM2024-04-08T17:31:00+5:302024-04-08T17:31:34+5:30

कणकवली : ज्येष्ठ व्यापारी सुरेश धडाम यांच्या स्मृतिनिमित्त महापुरुष मित्रमंडळाने कणकवली झेंडा चौकात आयोजित केलेल्या राधा कृष्ण नृत्य रोंबाट ...

Ganesha Kripa Tendoli Mandal First in Radha Krishna Dance Rombat Competition, Performances by Various Teams Spectacular | राधा कृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत गणेशकृपा तेंडोली मंडळ प्रथम, विविध संघांनी सादर केलेले कलाविष्कार लक्षवेधी 

राधा कृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत गणेशकृपा तेंडोली मंडळ प्रथम, विविध संघांनी सादर केलेले कलाविष्कार लक्षवेधी 

कणकवली : ज्येष्ठ व्यापारी सुरेश धडाम यांच्या स्मृतिनिमित्त महापुरुष मित्रमंडळाने कणकवली झेंडा चौकात आयोजित केलेल्या राधा कृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत विविध संघांनी सादर केलेले कलाविष्कार लक्षवेधी ठरले. या स्पर्धेत गणेशकृपा तेंडोली-कुडाळ या मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. गावडोबा कलेश्वर, राईचीवाडी या संघाने द्वितीय तर गजानन भजन मंडळ, नेरूर- कुडाळ संघाने तृतीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेचा शुभारंभ मंडळाचे माजी अध्यक्ष राजेश सापळे व वारकरी विलास बीडये यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी,उपाध्यक्ष राजन पारकर, खजिनदार मंदार सापळे, निलेश धडाम,राजू मानकर, उदय मुंज,साई अंधारी, सौरभ पारकर, महेंद्र सांबरेकर मुकुंद खानोलकर, बाळा सापळे,काशिनाथ कसालकर आदी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले.

स्पर्धेअंतर्गत 'खो..खो.. खेळ खेळती संवगडी..',' क्षण हा आनंदाचा.. सण हा होळीचा.. खेळ रंगला शिमग्याचा' अशा विविध गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित एकापेक्षा एक लक्षवेधी  चित्ररथ देखावे, सोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांच्या अप्रतिम सादरीकरणाने नागरिक भारावून गेले. शिमगोत्सवानिमित्त महापुरुष मित्रमंडळ आयोजित केलेली राधा कृष्ण रोंबाट स्पर्धा कणकवलीकरांसाठी अविस्मरणीय ठरली.

राधा कृष्ण रोंबाट स्पर्धेत भव्य  चित्ररथ देखाव्यांतून कलाविष्कारांचे एकापेक्षा एक सरस असे सादरीकरण करण्यात आले. गौळण व भारूडांवर या सर्व संघातील कलाकारांनी कलाविष्कराचे अप्रतिम सादरीकरण केले. बाजरपेठ, झेंडा चौकातील मांड उत्सवात हलत्या ट्रिकसीनयुक्त देखाव्यांसह कलाविष्करांचा सोहळा नेत्रदीपक ठरला. याशिवाय सोंगांचा कार्यक्रम उत्तरोतर रंगतदार ठरला. या स्पर्धेचे  बाळू वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Ganesha Kripa Tendoli Mandal First in Radha Krishna Dance Rombat Competition, Performances by Various Teams Spectacular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.