गडगंज पगाराची नोकरी सोडून फुलवला भाजीचा मळा, माडखोलच्या माळरानावर विदेशी भाज्यासह मशरूमची शेती

By अनंत खं.जाधव | Published: April 14, 2024 04:54 PM2024-04-14T16:54:41+5:302024-04-14T16:55:06+5:30

सावंतवाडी : गडगंज पगाराची विदेशी बँकेतील नोकरी ला लाथाडून चक्क मालवण तालुक्यातील पराड गावातील मनोज पराडकर येथील तरूणाने माडखोल ...

Gadganj gave up a salary job and started Phulvala vegetable garden, mushroom farming with exotic vegetables on the Malrana of Madkhol. | गडगंज पगाराची नोकरी सोडून फुलवला भाजीचा मळा, माडखोलच्या माळरानावर विदेशी भाज्यासह मशरूमची शेती

गडगंज पगाराची नोकरी सोडून फुलवला भाजीचा मळा, माडखोलच्या माळरानावर विदेशी भाज्यासह मशरूमची शेती

सावंतवाडी : गडगंज पगाराची विदेशी बँकेतील नोकरी ला लाथाडून चक्क मालवण तालुक्यातील पराड गावातील मनोज पराडकर येथील तरूणाने माडखोल नमसवाडी येथे येथील माळरानावर चक्क भाजीचा मळा फुलवला असून यातून अनेकांना रोजगार दिलेच त्याशिवाय येथे देशी विदेशी  भाजीपाल्याला सिंधुदुर्ग व गोव्यातील बाजारपेठ ही मिळवून दिली आहे.

पराडकर याच्या या प्रयत्नाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत असून यातून अनेकांनी बोध घेण्याची गरज ही निर्माण झाली आहे. पराड गावातील मनोज पराडकर हे उच्च शिक्षित असून मुंबई येथील विदेशी बॅकेत उच्च पदस्थ अधिकारी होते.मात्र त्याचे नोकरीत काहि मन रमत नव्हते तेव्हा त्यांच्या पुढे एकतर विदेशात जाऊन नोकरी करायची अन्यथा गावाकडे जाऊन शेती करायची असे दोन प्रश्न होते त्यातील एक निर्णय घ्याचा असे त्यांच्यापुढे आवाहन होते.त्यातच आपण गावाकडे जाऊन शेती करायची असे स्वप्न उराशी बाळगून पराडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले अनेक दिवस जागा शोधल्या आणि नंतर त्यांनी माडखोल नमसवाडी येथे साडे बारा एकरची जमिन खरेदी केली.

 ही जमिन पूर्णता नापीक आणि खडकाळ होती जमिनीत जाण्यास साधा रस्ता ही नव्हता अशातच या जमिनीत काय फुलणार हे त्याना कळत नव्हते.सुरूवातीच्या काळात कुटूंबातील सदस्य ही नोकरी सोडून तू काय करतोस म्हणून पराडकर यांची चेष्टा करत असत पण ते जरा सुध्दा मागे हटले नाहीत.

त्यानी माडखोल नमसवाडी येथील डोंगराळ दुर्गम अशा भागात जवळपास 12 एकर जागेत पाॅलीहाऊस फुलवला असून यात भव्य दिव्य असा मशरूम आणि विदेशी भाजीपाला यांची व्हर्टिकल्चर शेती चा मळा फुलवला आहे पडीक डोंगराळ जमिनीत भाजीपाला आणि मशरूम असा एकत्रित कृषी शेती प्रयोग करणारे हे बहुधा या सह्याद्री पट्ट्यात पहिलेच आहेत.सुरूवातीच्या काळात हे सर्व करतना पराडकर यांना अनेक समस्या जाणवल्या पण आज ते प्रगतशील शेतकरी म्हणून पुढे येत आहेत. माडखोल सारख्या दुर्गम डोंगराळ गावात एक नवी जीवनशैली सुरू केली आहे.

 यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू गरजू तरुणांना या पॉलिहाऊस चा नवा पॅटर्न आखून दिला आहे.या डोंगरावर आज हिरवा गार भाजीपाला विकसित केंद्र बनत आहे. “एक्झोबाईट” या ब्रँडच्या माध्यमातून चेरी, टोमॅटो, ब्रोकली, ऑईस्टर मशरूम, जुकिणी, हॅलेपिनो यांसारख्या ऑरगॅनिक भाज्यांची उत्पादने ते घेत आहेत. एक्झो बाईट हा ब्रँड त्यांनी आपल्या सावंतवाडी बाजारपेठेत एक नवी ओळख निर्माण करत आहेत.

सावंतवाडी बाजारपेठेबरोबर गोवा बाजारपेठ करण्याच्या दृष्टीने ही त्यांनी पाऊल टाकले आहे.त्यांनी  दोन वर्षात पॉलिहाऊस उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलली मशरूम आणि विदेशी भाजी मिरची असा प्रकल्प पराडकर यानी उभारला आहे आज सावंतवाडी बाजारपेठेत मशरूम आणि मिरची आधी भाज्यांना मागणी आहे सावंतवाडी बाजारपेठेतील अनेक विक्रेते एक्झोबाईट ब्रँडच्या भाज्या मशरूम ते विकत आहेत.

Web Title: Gadganj gave up a salary job and started Phulvala vegetable garden, mushroom farming with exotic vegetables on the Malrana of Madkhol.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.