शेतकरी संपाला पूर्ण पाठिंबा

By admin | Published: June 2, 2017 11:17 PM2017-06-02T23:17:56+5:302017-06-02T23:17:56+5:30

शेतकरी संपाला पूर्ण पाठिंबा

Full support for farmers' movement | शेतकरी संपाला पूर्ण पाठिंबा

शेतकरी संपाला पूर्ण पाठिंबा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मालवण : राज्यात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. स्वामीनाथन अहवालातील तरतुदीनुसार राज्यातील शेतकरीवर्गाला सरकारने कर्जमाफी तसेच त्यांनी पिकविलेल्या मालाला आधारभूत किंमत दिली पाहिजे. मात्र, राज्य सरकार काहीच पुढाकार घेत नसल्याची खंत माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा, अशी भूमिका घेतली आहे.
मालवण येथील ‘नीलरत्न’ निवासस्थानी आमदार राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, जिल्हा उपाध्यक्ष बाळू कोळंबकर, नगरसेवक दीपक पाटकर, मोहन वराडकर, संजय लुडबे, महेश जावकर, डॉ. जितेंद्र केरकर, भाई मांजरेकर, राजू बिडये, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे यांनी राज्य सरकार व प्रशासनावर टीका केली. सरकार म्हणून मंत्री काही निर्णय घेत असल्याने जिल्ह्यासह राज्यात प्रशासन असल्याची जाणीवच होत नाही. परिणामी सर्व विकासकामे ठप्प झाली असून, याचा विकासावर मोठा परिणाम झाला आहे, असे राणे यांनी सांगितले, तर आमदार वैभव नाईक यांनी सर्व कामांचे ठेके घेत जिल्ह्यात निकृष्ट दर्जाची विकासकामे केली आहेत, असाही आरोप राणे यांनी केला.
मत्स्योद्योग मंत्र्यांची उडविली खिल्ली
राज्याचे मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या विधानाची राणे यांनी खिल्ली उडवली. जानकरांना मासेमारी क्षेत्रातील काय कळते? असा सवाल करत मत्स्योद्योग मंत्री पर्ससीनचे आवाहन करून पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय करत असतील तर गप्प बसणार नाही.
नियम झुगारुन पर्ससीन मासेमारी करून पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय केल्यास त्यांच्यावर अन्याय होऊ न देता बाजूने राहणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. मात्र, जानकर यांच्या विरोधात आपल्याकडे पारंपरिक मच्छिमारांची तक्रार आली नसल्याचे राणे यांनी सांगितले.

Web Title: Full support for farmers' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.