खारेपाटणनजीक चारचाकी दरीत कोसळून ५ जण गंभीर  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 10:52 PM2017-10-22T22:52:25+5:302017-10-22T22:52:40+5:30

कणकवली तालुक्यातील खारेपाटणपासून ३ किलोमीटर अंतरावरील नडगिवे येथे मुंबईहून आचरा (वायंगणी) येथे जाणारी चारचाकी गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला

 Four people were seriously injured in four-wheeler rains | खारेपाटणनजीक चारचाकी दरीत कोसळून ५ जण गंभीर  

खारेपाटणनजीक चारचाकी दरीत कोसळून ५ जण गंभीर  

googlenewsNext

कणकवली - तालुक्यातील खारेपाटणपासून ३ किलोमीटर अंतरावरील नडगिवे येथे मुंबईहून आचरा (वायंगणी) येथे जाणारी चारचाकी गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकीमधील २ महिला, २ पुरुष व एक मुलगी गंभीर जखमी झाली आहेत. हा अपघात सायंकाळी सायंकाळी ५.३0 च्या सुमारास घडला.
मुंबई प्रभादेवी येथून अमर विनायक सूर्यवंशी हे आपली चारचाकी घेऊन आचरा येथे जाण्यास निघाले होते. सायंकाळी ५.३0 च्या दरम्यान नडगिवेनजीक एका अवघड वळणावर आले असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटून रस्त्यावरील कठडा तोडून चारचाकी सुमारे २0 फूट खोल दरीत कोसळली.
गाडीतील प्रवासी प्राजक्ता अमर सूर्यवंशी, अमर विनायक सूर्यवंशी, प्रभाकर शंकर चव्हाण, प्रणिता प्रभाकर चव्हाण, दुर्वा अमर सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी खारेपाटण येथील डॉ. रानडे व डॉ. प्रिया पेडणेकर यांना बोलावण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी रुग्णांना दवाखान्यात आणण्यासाठी मदत केली.

Web Title:  Four people were seriously injured in four-wheeler rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात