आधी शेतकरी, मग सरकार; आशिष शेलारांनी राज्‍यातील पेचप्रसंगावर बोलणे टाळले        

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 09:33 PM2019-11-02T21:33:54+5:302019-11-02T21:34:14+5:30

अशिष शेलार यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेबाबत बोलण्याचे टाळले.

First the farmers, then the government; Ashish Shelara refuses to speak on the issue in the state | आधी शेतकरी, मग सरकार; आशिष शेलारांनी राज्‍यातील पेचप्रसंगावर बोलणे टाळले        

आधी शेतकरी, मग सरकार; आशिष शेलारांनी राज्‍यातील पेचप्रसंगावर बोलणे टाळले        

googlenewsNext

सावंतवाडी : पहिला शेतकरी नंतर सरकार असे  सांगत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री अशिष शेलार यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेबाबत बोलण्याचे टाळले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का या प्रश्नावर ही ही यांनी नो कॉमेंट्स म्हणत मौन बाळगले.
 
शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार हे शनिवारी कोलगाव येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता सध्याच्या राजकीय घडामोडींवर मंत्री शेलार यांनी बोलण्याचे टाळले.  मंत्री शेलार यांना राज्यात सध्या सरकार स्थापन यावरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगाबाबत विचारला असता पहिला शेतकरी नंतर सरकार, असे त्रोटक उत्तर दिले. तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का यावरही मंत्री शेलार यांनी नो कमेंट्स म्हणत मौन बाळगले. 

Web Title: First the farmers, then the government; Ashish Shelara refuses to speak on the issue in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.