सर्वांगसुंदर महोत्सवाचा आनंद लुटा ! संजना सावंत यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:27 PM2019-02-04T17:27:23+5:302019-02-04T17:29:02+5:30

कणकवली पर्यटन महोत्सवाच्या अंतर्गत होम मिनिस्टर स्पर्धा घेऊन महिलांच्या उपजत कला गुणांना वाव देण्याचा एक चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन करण्याचा मान मिळाल्याने माझ्यासाठी आज दुग्धशर्करा योग आहे. या सर्वांगसुंदर महोत्सवात सहभागी होऊन नागरिकांनी आनंद लुटत त्यात आणखीन रंगत आणावी.असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले.

Enjoy the celebration of the Golden Jubilee! Invitation of Sanjana Sawant | सर्वांगसुंदर महोत्सवाचा आनंद लुटा ! संजना सावंत यांचे आवाहन

 कणकवली पर्यटन महोत्सवातर्गत होममिनिस्टर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे , प्रणिता पाताडे, सभापती सुजाता हळदिवे , सूचिता दळवी , स्वाती राणे, संजीवनी पवार, सुप्रिया नलावडे आदी उपस्थित होत्या.

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वांगसुंदर महोत्सवाचा आनंद लुटा ; संजना सावंत यांचे आवाहनकणकवलीत होममिनिस्टर, फूड फेस्टिव्हल स्पर्धा उदघाटन

कणकवली : कणकवली पर्यटन महोत्सवाच्या अंतर्गत होम मिनिस्टर स्पर्धा घेऊन महिलांच्या उपजत कला गुणांना वाव देण्याचा एक चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन करण्याचा मान मिळाल्याने माझ्यासाठी आज दुग्धशर्करा योग आहे. या सर्वांगसुंदर महोत्सवात सहभागी होऊन नागरिकांनी आनंद लुटत त्यात आणखीन रंगत आणावी.असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या कणकवली पर्यटन महोत्सव २०१९' च्या पूर्वसंध्येला फूड फेस्टिव्हल व महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेचे उद्घाटन संजना सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे , स्वाभिमान पक्ष महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे ,उपसभापती सूचिता दळवी , स्वाती राणे, संजीवनी पवार, नगरसेवक अभिजित मुसळे, अबीद नाईक, संजय कामतेकर, विराज भोसले, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, मयुरी मुंज ,राजश्री पवार , सायली मालंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संजना सावन्त म्हणाल्या, ओरोस येथे क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्याची संधी आज मला मिळाली . त्यानंतर या महोत्सवाचे उदघाटन होत आहे. या महोत्सवाच्या अंतर्गत आयोजित होमिनिस्टर स्पर्धेत महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेली पैठणी देऊन विजेत्या महिलेला गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा.

प्रणिता पाताडे म्हणाल्या , आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांचे सहकारी झटत आहेत. हे चांगले असून जिल्हावासियाना मनोरंजनासाठी ही एक चांगली संधी आहे.

सुजाता हळदिवे म्हणाल्या, या महोत्सवाच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांनी ' देऊ तो शब्द पुरा करू ' हे त्यांचे ब्रीद खरे करून दाखविले आहे. हा महोत्सव म्हणजे एक बहारदार कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले.

 

Web Title: Enjoy the celebration of the Golden Jubilee! Invitation of Sanjana Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.