नोकरीच्या मागे धावू नका; उद्योजक बना : कमलाकर सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:24 PM2018-09-13T23:24:20+5:302018-09-13T23:24:26+5:30

सरकारी आणि खासगी क्षेत्रांमध्ये नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. तर दुसऱ्या बाजूला उद्योग व व्यवसायात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता

    Do not run behind the job; Become an entrepreneur: Kamlakar Sawant | नोकरीच्या मागे धावू नका; उद्योजक बना : कमलाकर सावंत

नोकरीच्या मागे धावू नका; उद्योजक बना : कमलाकर सावंत

Next
ठळक मुद्दे कणकवली महाविद्यालयातर्फे उद्योजकता जाणीव शिबिर

कणकवली : सरकारी आणि खासगी क्षेत्रांमध्ये नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. तर दुसऱ्या बाजूला उद्योग व व्यवसायात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता स्वत:मधील उद्योजकाचा शोध घ्यावा व उद्योजक बनावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वाणिज्य व उद्योगसंघाचे माजी अध्यक्ष कमलाकर सावंत यांनी कणकवली महाविद्यालय येथे आयोजित शिबिरात केले.

कणकवली महाविद्यालय येथे केंद्र सरकार उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद व कणकवली महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता जाणीव शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कमलाकर सावंत बोलत होते. यावेळी त्यांनी तरुणांनी त्यांच्यामधील उद्योजकतेचा विकास करावा. उद्योगासाठी आज शासन सर्वतोपरी मदत करीत आहे; पण उद्योग उभा करण्याअगोदर उद्योगासाठी आवश्यक तांत्रिक व व्यवस्थापकीय कौशल्य आत्मसात करावे, असा सल्ला दिला. या सत्रामध्ये जिल्हा फळ प्रक्रिया संघाचे संचालक गजानन तांबे यांनी विद्यार्थ्यांनी समविचारी लोकांचे गट स्थापन करून उद्योग उभारावेत, असे आवाहन केले.

या शिबिरादरम्यान विविध मान्यवर, उद्योजक यांनी विद्यार्थ्यांना उद्योग व उद्योजकता याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वबळावर छोटे उद्योग व व्यवसाय उभे करावेत. नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा आहे.कष्ट केल्यास विद्यार्थी उद्योग व सेवा क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी कोणताही व्यवसाय सुरू करताना कमीपणा बाळगू नये, स्पर्धेत टिकण्यासाठी कष्ट आवश्यक आहेत, असा कानमंत्रही शिंदे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

उद्योगासाठी पायाभूत बाबींबद्दल माहिती देताना प्रा. डॉ. बाबासाहेब माळी यांनी उद्योगास सुरुवात करीत असताना कोणत्या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. उद्योगाकडे चांगली संधी म्हणून पाहावे. उद्योग उभारताना मनुष्यबळ व्यवस्थापन, कायदेशीर बाबी, कर व्यवस्थापन यांचा व्यवस्थित विचार केल्यास उद्योग यशस्वी होऊशकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिबिराच्या दुसºया दिवशी विदर्भ कोकण बँकेचे व्यवस्थापक पंकज धुरी यांंनी उद्योगांना अर्थपुरवठा करण्यासाठी बँकांकडून आणि शासनामार्फत राबविण्यात येणाºया योजनांचा लाभ कसा घ्यावा, उद्योगासाठी कर्ज मागणी करताना सादर करावा लागणारा प्रकल्प आढावा स्वत: उद्योजकाने तयार करावा, असे सांगितले.
या शिबिराची सुरुवात प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

शिबिराबद्दलची माहिती प्रास्ताविकात शिबिर समन्वयक प्रा. डॉ. शामराव डिसले यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गितांजली सापळे यांनी केले. या शिबिराला ८० विद्यार्थी उपस्थित
होते. प्रा. रोहिणी कदम यांनी आभार मानले.


इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आवश्यक : फराकटे
यशस्वी उद्योगासाठी संभाषण कौशल्य या सत्रामध्ये मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. फराकटे यांनी संभाषण कौशल्य हे उद्योजकांमधील आवश्यक गुण असून, उत्तम संभाषण कौशल्य व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व उद्योग विश्वासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे सांगितले.

उद्योजक कसे बनावे, याबाबत मार्गदर्शन : शिबिराच्या अंतिम टप्प्यामध्ये रुचिरा खाद्यपदार्थ या अग्रणी उत्पादनाचे संस्थापक व निर्माते दिनानाथ गावडे यांनी उद्योजक कसा घडतो व उद्योग कसा उभा राहतो, या विषयावर विद्यार्थ्यांबरोबर मुक्त संवाद साधला. शिबिरामध्ये प्रा. सुरेश पाटील व दत्तगुरू पाटकर यांनी उद्योजक कसा असावा व उद्योजक कसे घडले, याबद्दल माहिती दिली. शिबिराच्या अखेरीस विद्यार्थ्यांना उद्योगस्थळी चालणाºया कामकाजाची माहिती मिळावी यासाठी गडार्क प्रयोगशाळा कुडाळ व सिंधुदुर्ग जिल्हा महिला उद्योग भवन, ओसरगाव याठिकाणी औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली.

Web Title:     Do not run behind the job; Become an entrepreneur: Kamlakar Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.