रंगतदार लढतीकडे शहरवासीयांचे लक्ष

By Admin | Published: November 14, 2016 09:44 PM2016-11-14T21:44:40+5:302016-11-15T00:47:12+5:30

प्रसन्ना कुबल यांना विरोधकांचे तगडे आव्हान : काँग्रेसच्या कृतिका कुबल यांचीही कसोटी

The attention of the city dwellers in a colorful battle | रंगतदार लढतीकडे शहरवासीयांचे लक्ष

रंगतदार लढतीकडे शहरवासीयांचे लक्ष

googlenewsNext

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादीने जागा रिक्त सोडल्याने काँग्रेस, शिवसेना, भाजप व अपक्ष यांच्यात लढत होणार आहे. माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल व सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल आमने-सामने ठाकल्याने ही लढत रंगतदार बनली आहे. दोघांपैकी कोणाला मतदार पसंती दर्शवितात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजप, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी दोन, तर अपक्ष एक, असे सात उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. प्रभाग ३ अ मध्ये सर्वसाधारण महिला गटात शिवसेनेच्या वृंदा मोर्डेकर, भाजपच्या अ‍ॅड. सुषमा प्रभुखानोलकर, तर काँग्रेसच्या कृतिका कुबल यांचा समावेश आहे. मोर्डेकर व प्रभुखानोलकर हे उमेदवार अनुभवी असून, काँग्रेसच्या कुबल या यंदा प्रथमच निवडणूक रिंगणात
आहेत.
अ‍ॅड. सुषमा प्रभुखानोलकर या मागच्यावेळी भाजपतर्फेच ५९३ मतांनी नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. यंदा शिवसेनेतर्फे उभ्या राहिलेल्या वृंदा मोर्डेकर या त्यावेळी त्यांच्या प्रमुख विरोधक होत्या. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा मोर्डेकर व प्रभुखानोलकर एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत.
वृंदा मोर्डेकर यांचे आजेसासरे कै. मामा मोर्डेकर हे पूर्वीच्या काळी वेंगुर्ले नगरपरिषेदेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मोर्डेकर व प्रभुखानोलकर यांचा जनसंपर्क मोठा आहे. या दोन जुन्या उमेदवारांविरोधात काँग्रेसने नवख्या कृतिका कुबल यांना उभे केले आहे. त्यामुळे प्रभाग ३ अ मध्ये सर्वसाधारण महिला गटासाठी तिरंगी लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक ३ ब सर्वसाधारण गटात भाजपचे प्रसन्ना कुबल, शिवसेनेचे विवेक कुबल, काँग्रेसचे विधाता सावंत व अपक्ष म्हणून वेंगुर्ले गॅसचे वितरक नंदन वेंगुर्लेकर यांचा समावेश आहे. माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल व सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल हे आमने-सामने आले असून, तसेच प्रभाग ३ मध्ये कुबलवाडा येत असल्याने येथून कोणाला जास्त मताधिक्य मिळते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रसन्ना कुबल हे यापूर्वीही नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर विवेक कुबल व नंदन वेंगुर्लेकर हे यापूर्वी अपयशी ठरले होते. काँग्रेसचे नवखे उमेदवार विधाता सावंत हे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. घाडीवाडा येथे त्यांचा प्रचंड मित्रपरिवार आहे.
तसेच सावंत हे युवा शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे यांचे मित्र आहेत. त्यामुळे एकूणच ही लढत मोठ्या प्रतिष्ठेची होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)


प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवार तुल्यबळ असून, त्यांचा जनसंपर्कही चांगला असल्याने उमेदवार निवडण्यासाठी मतदारांपुढे आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: The attention of the city dwellers in a colorful battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.