लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:26 PM2019-04-23T23:26:39+5:302019-04-23T23:26:44+5:30

रत्नागिरी : सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला ...

65 percent polling for the Lok Sabha | लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान

लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान

Next

रत्नागिरी : सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.३७ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानासाठी असलेली गर्दी पाहता जिल्हा प्रशासनाकडून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या मतदारसंघात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर, शिवसेनेचे विनायक राऊत, स्वाभिमानचे नीलेश राणे, वंचित बहुजन आघाडीचे मारुती रामचंद्र जोशी, बीआरएसपीचे राजेश जाधव, बसपचे किशोर वरक, समाजवादी फॉरवर्ड ब्लॉकचे संजय गांगनाईक, बहुजन मुक्ती पार्टीचे भिकुराम पालकर, तसेच अपक्ष विनायक लवू राऊत, पंढरीनाथ आंबेरकर, नीलेश भातडे, नारायण गवस यांचा समावेश आहे. रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघांतील १०२७, तर सिंधुदुर्गमधील तीन विधानसभा मतदारसंघांतील ९१५ अशा एकूण १९४२ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. दोन तासांत साधारणत: १० टक्के मतदान झाले. अकरा वाजेपर्यंत २१.५९ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३५.६९, ३ वाजेपर्यंत ४५.१०, तर पाच वाजेपर्यंत ५६.५२ टक्के मतदान झाले. साधारणत: दोन तासांत दहा टक्के मतदान झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार १४ लाख ५४ हजार ५२५ मतदार आहेत. यापैकी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८ लाख २२ हजार १२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष मतदारांची संख्या ४,१०,८०० (५७.७० टक्के), तर महिला मतदारांची संख्या ४ लाख ११ हजार ३२० (५५.४० टक्के) होती. या कालावधीत एकाही तृतीयपंथी मतदाराने मतदान केले नाही.
पाच वाजल्यानंतर शेवटच्या तासात काही ठिकाणी मतदारांनी गर्दी केली. त्यामुळे पुढच्या एका तासात सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत मतदान होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

रत्नागिरी केंद्र संख्या एकूण मतदार झालेले मतदान टक्के
चिपळूण ३३४ २,६९,१४० १,३८,५३७ ५१.४७
रत्नागिरी ३४५ २,८०,८१९ १,६५,९७२ ५९.१०
राजापूर ३३८ २,३७,८४५ १,२,१००८ ५०.८८
सिंधुदुर्ग/
कणकवली ३३० २,२९,५२६ १,२७,९१० ५५.७३
कुडाळ २७७ २,१२,६६८ १,२९,८६६ ६०.७८
सावंतवाडी ३०८ २,२३,५२६ १,३८,८२७ ६२.११
एकूण १०४२ १४,५४,५२४ ८,२२,१२९ ५६.५२

धोपावेत पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार
रायगड मतदारसंघात
समाविष्ट असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील, गुहागर तालुक्यातील धोपावे येथे १३00 पैकी तब्बल ९00 मतदारांनी मतदान केले नाही.
२५ वर्षे आपला पाणीप्रश्न सुटला नसल्याने या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

Web Title: 65 percent polling for the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.