गोवा बनावटीची दारु, तस्करांना ३ वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 09:32 PM2019-05-08T21:32:40+5:302019-05-08T22:04:12+5:30

सिंधुदुर्ग जिल्हयात अनेक वर्षांमध्ये गोवा बनावटीची दारु तस्करी करणाºया अनेक गुन्ह्यांमध्ये संशयीत आरोपी मोकाट सुटायचे. मात्र ओसरगाव येथे टेम्पोतुन दारु वाहतुक करताना आरोपी तन्वीर इकबाल

3 years imprisonment for Goa-based liquor, smugglers | गोवा बनावटीची दारु, तस्करांना ३ वर्षाचा कारावास

गोवा बनावटीची दारु, तस्करांना ३ वर्षाचा कारावास

Next
ठळक मुद्दे सरकारी वकील गजानन तोडकरी यांची उत्कृष्ट कामगिरी

कणकवली  :  सिंधुदुर्ग जिल्हयात अनेक वर्षांमध्ये गोवा बनावटीची दारु तस्करी करणाºया अनेक गुन्ह्यांमध्ये संशयीत आरोपी मोकाट सुटायचे. मात्र ओसरगाव येथे टेम्पोतुन दारु वाहतुक करताना आरोपी तन्वीर इकबाल शेख (३९, रा. सावंतवाडी), शमीर शब्बीर शहा (२८, रा. झाराप-कुडाळ) या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ आॅक्टोंबर २०१७ रोजी पकडले होते. या दोन्ही आरोपींनी गोवा बनावटीची दारु २५ लाख ६२ हजार ६०० रुपयाची ताब्यात बाळगुन वाहतुक केल्याचे शाबित झाल्याने कणकवलीचे सहन्यायाधीश सदानंद पाटील यांनी ३ वर्षाचा कारावास व १ लाखाचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

       

सिंधुदुर्गातुन गोवा बनावटीची दारु वाहतुक करत असताना दोन्ही संशयीतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकुन ओसरगावात पकडले होते. या गुन्ह्याबाबत कणकवली न्यायालयात दोषारोपपत्र आरोपी तन्वीर शेख, शमीर शहा या दोघांविरोधात दाखल करण्यात आले होते. या आरोपींविरोधात महाराष्ट दारु बंदी कायदा ६५ (अ), ६५(ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणात कणकवली न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. न्यायमुर्ती सदानंद पाटील यांनी दोन्ही कलमांतर्गत तीन वर्षाची शिक्षा व प्रत्येक गुन्ह्यात ५० हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यामुळे एकुण १ लाखाचा दंड आरोपींना करण्यात आला आहे.

          या गुन्ह्याची तक्रार  सहाय्यक दुय्यम निरिक्षक चंद्रकांत पवार यांनी दिली होती. तसेच तपास काम निरिक्षक अमित पाडाळकर यांनी केले होते. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकात सहाय्यक उपनिरिक्षक गोपाळ राणे, दुय्यम निरिक्षक नडे, शिंदे, कुवेसकर आदींचा पथकामध्ये सहभाग होता. सिंधुदुर्गात गोवा बनावटीची दारु तस्करी करणाºया आरोपींविरोधात ही पहिलीच शिक्षा बºयाच वर्षाच्या कालावधीने न्यायालयाने दिली आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. गजानन तोडकरी यांनी काम पाहीले. अ‍ॅड. तोडकरी यांनी या गुन्ह्यात वेगवेगळया पाच साक्षीदारांची तपासणी केली. त्यामुळे आरोपींना शिक्षा होण्यास मदत झाली आहे. गेल्या काही महिन्यातील विविध गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

Web Title: 3 years imprisonment for Goa-based liquor, smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.