लैंगिक जीवन : पूर्वी उत्तेजना वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विचित्र पद्धती वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 04:39 PM2019-05-31T16:39:24+5:302019-05-31T16:43:26+5:30

प्राचीन काळात शारीरिक संबंध रोमांचक करण्यासाठी आणि उत्तेजना वाढण्यासाठी काही विचित्र पद्धतींचा वापर करत होते.

Weird and shocking facts about sex and things used for erection in ancient times | लैंगिक जीवन : पूर्वी उत्तेजना वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विचित्र पद्धती वाचून व्हाल अवाक्!

लैंगिक जीवन : पूर्वी उत्तेजना वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विचित्र पद्धती वाचून व्हाल अवाक्!

googlenewsNext

शारीरिक संबंधावर आजही समाजात मोकळेपणाने बोललं जात नाही. पण शारीरिक संबंध हा जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यावर सतत काहीना काही रिसर्च होत राहतात. जुन्या काळातीलही अनेक गोष्टींचा रिसर्चमधून खुलासा होत राहतो. आता जसे शारीरिक संबंध रोमांचक करण्यासाठी किंवा उत्तेजना वाढवण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात, तशाच पूर्वीही केल्या जात होत्या. प्राचीन काळात शारीरिक संबंध रोमांचक करण्यासाठी आणि उत्तेजना वाढण्यासाठी काही विचित्र पद्धतींचा वापर करत होते. त्या पद्धती काय होत्या याबद्दल जाणून घेऊया. अर्थातच या पद्धती केवळ माहिती म्हणून तुमच्यापर्यंत आणत आहोत. या पद्धतींचा वापर करणे तुम्हाला महागात पडू शकतं.

प्रायव्हेट पार्टवर मध आणि तिखट

प्राचीन ग्रीसमध्ये लोक शारीरिक संबंधादरम्यान उत्तेजना वाढवण्यासाठी आणि अधिक आनंदासाठी मध आणि तिखटाचा वापर करत होते. त्यावेळी पुरूष प्रायव्हेट पार्टवर मध आणि तिखटाचं मिश्रण लावत होते. असे मानले जात होते की, असं केल्याने जास्त वेळ इरेक्शन कायम ठेवण्यास मदत मिळते. डेली मेलनुसार, यूनिव्हर्सिटी ऑफ वेल्सचे सायकॉलॉजिस्ट व डॉ. स्टेमिना बेनटन यांनी सांगितले की, कामसूत्रात मधाचा प्रेम आणि शारीरिक संबंधाशी खास संबंध मानला आहे. याने क्षमता वाढवण्यास मदत मिळते. ग्रीसचे प्रसिद्ध फिजिशिअन हिप्पोक्रेट्स सुद्धा शारीरिक संबंधादरम्यान जोश वाढवण्यासाठी आणि रोमांच वाढवण्यासाठी मधाचं सेवन करण्याचा सल्ला देत होते.

विना इजॅक्युलेशन शारीरिक संबंध

चीनची फिलॉसॉफी ताओइसम किंवा दाओइसम (Taoism) मानणारे लोक इजॅक्यूलेशन(स्खलन) न करता शारीरिक संबंध ठेवत होते. या लोकांचं मत होतं की, शारीरिक संबंधादरम्यान इजॅक्यूलेशनने शरीरातील झिंग नष्ट होतं, ज्यामुळे वेगवेगळे आजारच काय मृत्युही होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी चीनी पुरूष इजॅक्यूलेट करत नव्हते. चीनी भाषेत झिंगला डीएनए बरोबरीत मानलं जातं. हे ते तत्व आहे जे मनुष्याचा जन्म होण्याआधीपासूनच त्यांच्या शारीरिक आणि ऊर्जात्मक गुणांना निर्धारीत करतं.

टक्कल आणि शारीरिक संबंधाचं स्वातंत्र्य

प्राचीन यूनानी शहर स्पार्टाच्या महिलांना शारीरिक संबंधासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं जात होतं. लग्नाच्या रात्री स्पार्टन महिलांचं टक्कल केलं जात होतं आणि त्यांना पुरूषांचे कपडे नेसवले जात होते. त्यानंतर त्या एका अंधाऱ्या खोलीत बसून राहत होत्या आणि नंतर पती त्यांना शोधून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होते. 

जो पहिल्यांदा दिसेल त्यांच्याशी शारीरिक संबंध

बेबीलोनच्या सभ्यतेमध्ये शारीरिक संबंधासाठी विचित्र पद्धतींचा वापर केला जात होता. ancient origins नुसार, बेबलोनमध्ये प्रत्येक महिलेला आयुष्यात एकदा मंदिरात नक्की पाठवत असत. तिथे जी व्यक्ती आधी महिलांच्या ओजंळीत नाणं टाकत होता, त्या व्यक्तीला त्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार मिळत होता. इतकेच नाही तर इथे लोकांना कोणत्याही ठिकाणी संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य होतं.

Web Title: Weird and shocking facts about sex and things used for erection in ancient times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.