लैंगिक जीवन : महिलांमध्येही पुरूषांप्रमाणे स्खलन होतं का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 04:45 PM2019-05-03T16:45:39+5:302019-05-03T16:51:35+5:30

फीमेल इजॅक्युलेशनबाबत(स्खलन म्हणजेच वीर्य बाहेर येणे) अनेकांनी ऐकलं असेल.

Does women ejaculate during sex? What is the truth behind it | लैंगिक जीवन : महिलांमध्येही पुरूषांप्रमाणे स्खलन होतं का? जाणून घ्या सत्य

लैंगिक जीवन : महिलांमध्येही पुरूषांप्रमाणे स्खलन होतं का? जाणून घ्या सत्य

googlenewsNext

(Image Credit : TheHealthSite.com)

फीमेल इजॅक्युलेशनबाबत(स्खलन म्हणजेच वीर्य बाहेर येणे) अनेकांनी ऐकलं असेल. पण त्याबाबत अनेकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज बघायला मिळतात. फीमेल इजॅक्युलेशन होतं किंवा नाही यावरूनही अनेक वाद आहेत. शारीरिक संबंध ठेवताना ज्याप्रमाणे पुरूषांचं इजॅक्युलेशन म्हणजे स्खलन होतं, तसंच महिलांमध्येही होतं असा एक मोठा गैरसमज अनेकांमध्ये असतो. तज्ज्ञ सांगतात की, मुळात फीमेल इजॅक्युलेशन अशी काही गोष्ट नसते. 

(Image Credit : Guest of a Guest)

काही वर्षांपूर्वी एका रिसर्चमधून असा दावा करण्यात आाल होता की, फीमेल इजॅक्युलेशन असतं आणि त्याचा महिलांच्या लैंगिक जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. पण सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांनी ही गोष्ट खोटी असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे हे स्पष्ट होतं की, याबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. 

(Image Credit : TLCme)

डॉ. राजन भोसले यांनी याबाबत आणखी माहिती देताना सांगितले की, 'फीमेल इजॅक्युलेशनबाबत अनेक लोकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे गैरसमज आहेत. सामान्यपणे शारीरिक संबंधाची इच्छा झाल्यावर किंवा शारीरिक संबंधासाठी उत्तेजित झाल्यावर महिलांच्या गुप्तांगातून एक चिकट द्रव्य बाहेर येतं, याला योनी सलील असं म्हणतात. शारीरिक संबंध ठेवताना लुब्रिकंट निर्माण व्हावं यासाठी गुप्तांगाच्या आतील बाजूनस असलेल्या बार्थोलिन ग्लॅंडमधून हे योनी सलील रिलीज होत असतं. पण अनेकजण यालाच इजॅक्युलेशन समजतात'. 

(Image Credit : LAmag)

ते पुढे सांगतात की, 'शारीरिक संबंध ठेवताना झटके देत होणारं स्खलन यालाच इजॅक्युलेशन असं म्हणतात. जसे की, पुरूषांमध्ये ऑर्गॅज्म होतं त्याच वेळेला इजॅक्युलेशन होतं. तर दुसरीकडे महिलांना ऑर्गॅज्मचा अनुभव होतो पण इजॅक्युलेशन होत नाही. त्यामुळे महिलांना इजॅक्युलेशन होतं असं म्हणण्याला काहीही आधार नाही'.  

Web Title: Does women ejaculate during sex? What is the truth behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.