लैंगिक जीवन : अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 02:30 PM2019-04-13T14:30:47+5:302019-04-13T14:31:55+5:30

विश्वात जन्म-मृत्यूप्रमाणे शारीरिक संबंधही आहे. नव्या जीवनासाठी याची गरज आहे आणि ही बाब कुणालाही शिकवावी लागत नाही.

10 facts about sex you never knew | लैंगिक जीवन : अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील!

लैंगिक जीवन : अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील!

(Image Credit : express.co.uk)

विश्वात जन्म-मृत्यूप्रमाणे शारीरिक संबंधही आहे. नव्या जीवनासाठी याची गरज आहे आणि ही बाब कुणालाही शिकवावी लागत नाही. जसे आपण चालणे-बोलणे स्वत:हून शिकतो तसंच शारीरिक संबंधाचं असतं. मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शारीरिक संबंधाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. याने काय काय होतं हे खालीलप्रमाणे पाहता येईल.

वाढते वेदना सहन करण्याची क्षमता

शारीरिक संबंधाने वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. ऑर्गॅज्ममुळे हार्मोन्सला गती मिळते आणि यानेच आपली वेदना सहन करण्याची क्षमताही वाढते. 

एका पुरुषात किती वीर्य

एक निरोगी आणि फिट पुरुष दोन आठवड्यात इतक्या वीर्याचा स्त्राव करु शकतो की, ज्याने जगभरातील महिलांना गर्भवती केलं जाऊ शकतं. 

काही तासच जिवंत असतं वीर्य

मनुष्याच्या गुप्तांगातून बाहेर आल्यावर वीर्य काही तासच जिवंत राहतं. पण महिलेल्या गुप्तांगात प्रवेश केल्यावर वीर्य तीन ते पाच दिवसांपर्यंत सक्रिय राहतं. 

लघवीला अडथळा

शारीरिक संबंधानंतर तुम्हाला लघवी करण्याला त्रास होत असेल. याचं कारण ऑर्गॅज्मनंतर शरीरात एक अॅंटी-डायुरेटिक हार्मोन तयार होतं, ज्यामुळे लघवीचा प्रवाह रखडतो. 

यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत नाही

हे आणखी हैराण करणारं आहे की, जर तुम्ही शारीरिक संबंधानंतर लघवी केली तर तुम्हाला यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत नाही. 

संबंध न ठेवता ऑर्गॅज्म

असं फार कमी होतं. पण काही महिलांना फोरप्ले दरम्यानच ऑर्गॅज्मचा आनंद मिळतो. 

स्ट्रेस बस्टर

शारीरिक संबंध ही प्रक्रिया एक चांगली स्ट्रेस बस्टर प्रक्रिया आहे. याने आपलं ब्लड प्रेशर कमी होत आणि शरीराला आराम मिळतो. 

वर्कआउटनंतर बेस्ट

वर्कआउटनंतर लगेच शारीरिक संबंध ठेवणे फायदेशीर मानले जाते. कारण एक्सरसाइजमुळे व्यक्तीच्या गुप्तांगाच्या आजूबाजूला रक्तप्रवाह वाढलेला असतो. याने चांगला अनुभव मिळू शकतो.

तारुण्याचं गुपित

तज्ज्ञ सांगतात की, आठवड्यातून कमीत कमी तीनदा शारीरिक संबंध ठेवले तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. वेगवेगळ्या समस्या दूर होतील. कारण शारीरिक संबंधाने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि याने शरीर फिट राहतं. 

Web Title: 10 facts about sex you never knew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.