विकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 02:55 PM2019-05-06T14:55:09+5:302019-05-06T14:55:52+5:30

वडिलांनी विकलेले घर परत न दिल्याने चिडून जाऊन युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना दौलतनगर येथे घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Youth beat up to return home | विकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण

विकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण

Next
ठळक मुद्देविकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

सातारा : वडिलांनी विकलेले घर परत न दिल्याने चिडून जाऊन युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना दौलतनगर येथे घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शरद नारायण फडतरे (रा. दौलतनगर, सातारा) याच्या वडिलांनी त्यांचे घर उदय बाबू पुजारी (वय ३५, रा. दौलतनगर, सातारा) यांना विकले आहे. हे घर पुजारी यांच्याकडून परत घेण्यासाठी शरद फडतरे याने त्याला विचारले. घर परत देण्यास पुजारी यांनी नकार देताच चिडलेल्या शरद फडतरेने आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका साथीदाराने पुजारीला बेदम मारहाण केली. पुजारी याच्या हातास, हनुवटीस, पाठीवर, खांद्यावर मार लागला आहे. पुजारी याने तक्रार दिल्यानंतर शरद फडतरे याच्यासह त्याच्या साथीदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Youth beat up to return home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.