यात्रेतील देणगी जलयुक्तच्या कामासाठी खर्च ,बनवडीत तुफान आलंया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:31 AM2018-04-15T00:31:44+5:302018-04-15T00:31:44+5:30

चला गा वबदलूया ,,,,, वाठार स्टेशन : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कोरेगाव तालुक्यातील बनवडी गावात खऱ्या अर्थाने जलयुक्त कामाचं तुफान आलं आहे. गावच्या यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देत या गावाने यात्रेतील देणगी जलयुक्त

 Yatra donation expenses for the work of drainage, construction of a storm | यात्रेतील देणगी जलयुक्तच्या कामासाठी खर्च ,बनवडीत तुफान आलंया

यात्रेतील देणगी जलयुक्तच्या कामासाठी खर्च ,बनवडीत तुफान आलंया

Next
ठळक मुद्दे नव्वद वर्षीय जगन्नाथ संकपाळ यांचेही श्रमदान


चला गा वबदलूया

वाठार स्टेशन : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कोरेगाव तालुक्यातील बनवडी गावात खऱ्या अर्थाने जलयुक्त कामाचं तुफान आलं आहे. गावच्या यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देत या गावाने यात्रेतील देणगी जलयुक्त शिवारसाठी खर्च करण्याचा ठराव ग्रामसभेत मांडला. वॉटर कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या कामात आघाडी घेतली आहे.
गावातील मतभेद विसरूण आपलं गाव पाणीदार करण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील ४१ गावे आता रात्रीचा दिवस करू लागले आहेत. या श्रमदानात लहान मुलापासून ते आबालवृद्धही जागर घालत आहेत. याच ठिकाणी तब्बल नव्वद वर्ष वय असलेले जगन्नाथ तात्याबा संकपाळ यांनी ही टिकाव, फावडे चालवून श्रमदानाचा हक्क बजावला आहेत. तरुणांना लाजवतील, असं त्यांच काम पाहून सर्वांनाच आर्श्चय वाटत आहे.
कोरेगाव तालुक्याचा उत्तर दुष्काळी भागातील जवळपास २७ गावांनी आमीर खान यांच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. याच स्पर्धेत बनवडी गावानेही पहिल्या दिवसापासून सक्रिय सहभाग घेत आघाडी घेतली. या लढाईत महिलांचा सहभाग लक्षणीय असून, दररोज सकाळी गावातील शेकडो पुरुष, स्त्रिया या शिवारात प्रार्थना म्हणून कामाची सुरुवात करतात. त्यानंतरच श्रमदानाचा प्रारंभ होत असल्याने दिवसभर काम करण्यासाठी पाण्यासाठी सर्वकाही सोडून ही मंडळी एक दिलानं या कामात सहभागी झाली आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून पाण्यासाठी सुरू असलेल्या या दुष्काळी भागातील लढ्यात अनेक सिनेकलाकार लोकप्रतिनिधींना या भागातील लोकांना श्रमदानाचे महत्त्व पटवून देण्यात यश आले. या भागातील अनेक गावात दररोज आमदार खासदार यांच्याशिवाय सिनेअभिनेते वॉटर कपचे प्रणेते आमीर खान, किरण राव, अक्षयकुमार, खासदार उदयनराजे भोसले यांनी या ठिकाणी येऊन श्रमदानाचा हक्क बजावला आहे.
४५ दिवसांच्या या लढाईत गेल्या तीन दिवसांतील कामाचा वेग पाहता त्यातील अनेक गावे या स्पर्धेत यशस्वी होतील, अशी परिस्थिती या भागातील लोकांच्या एकजुटीतून दिसत आहे.
 

Web Title:  Yatra donation expenses for the work of drainage, construction of a storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.