उद्धवना कानठळ््या... हॉटेल सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:59 PM2017-12-24T23:59:44+5:302017-12-24T23:59:44+5:30

Uthavana Kanthalya ... Hotel Seal | उद्धवना कानठळ््या... हॉटेल सील

उद्धवना कानठळ््या... हॉटेल सील

Next

सचिन जवळकोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : हवा पालटासाठी महाबळेश्वरला मुक्कामी आलेले उद्धव ठाकरे कुटुंबीय शेजारच्या हॉटेलमधील विदर्भातील वरातीच्या नाचगाण्यामुळं अस्वस्थ झाले. त्याचा राग महाबळेश्वरमधील सर्वात मोठ्या ‘हॉटेल कीज’वर काढण्याचं परमकर्तव्य शिवसेनेच्या मंत्र्यांनी तत्परतेनं केलं. विशेष म्हणजे, या हॉटेलमध्ये नाचणारी विदर्भातली वºहाडी मंडळी मुख्यमंत्र्यांच्या जवळची निघाल्यानं साताºयाच्या प्रशासनाची भलतीच गोची झालीय.
पंधरा दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे अन् त्यांचं कुटुंबीय महाबळेश्वरमध्ये दाखल झालं होतं. त्यांचे परम मित्र अन् उद्योजक अविनाश भोसले यांचा बंगला त्यांच्या स्वागतासाठी नेहमीप्रमाणं आतूरच होता. याच काळात शेजारील ‘हॉटेल कीज’मध्ये विदर्भातील एका भाजप आमदाराच्या पुतण्याचा विवाह सोहळा सुरू होता. सायंकाळी वरात निघाल्यानंतर या मंडळींनी डीजे लावून नाचण्यास सुरुवात केली. तेव्हा अस्वस्थ झालेल्या शेजारच्या ठाकरे कुटुंबीयाकडून हा आवाज बंद करण्याचं फर्मान निघालं.
मुंबईहून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांना आदेश गेले. या अधिकाºयांनी हॉटेल व्यवस्थापनाला सूचना केली. मात्र, उत्साही वºहाडी मंडळी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. मुंबईतील ‘सरकार’चा आदेश धुडकावून विदर्भातील वºहाडी मंडळींची वरात मोठ्या थाटात सुरूच राहिली.
त्यानंतर पोलीस खात्यालाही आदेश गेले; परंतु त्याचवेळी ‘रात्री दहाच्या आत कशी काय कारवाई करणार?’ असा सवाल खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून विचारला गेल्यानं पोलीस अधिकारी गप्पच बसले. दोन मोठ्या खात्यांच्या शीतयुद्धात पोलिसांची गोची झाली. मात्र, दबाव प्रचंड वाढल्यानंतर या वºहाडी मंडळींवर ध्वनिप्रदूषणाची कारवाई करण्यात आली.
काही दिवसांनी ठाकरे कुटुंबीय मुंबईत परतल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून सूत्रं हलली. विधानसभेच्या अधिवेशनात महाबळेश्वरमधील ‘भल्यामोठ्या’ ध्वनीप्रदूषणावर गंभीरपणे चर्चा करण्यात आली. प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी या हॉटेलवरच थेट कारवाई केली. जवळपास अलिशान ८४ खोल्या असलेल्या सर्वात मोठ्या हॉटेलला सील ठोकलं गेलं.
महाबळेश्वर नगरपालिकेलाही रामदास कदम यांच्या कार्यालयातून फर्मान सुटलं. त्यानुसार नगरपालिकेनं या हॉटेलचं नळ कनेक्शन तोडलं. विद्युत पुरवठा तोडण्यासाठीही अधिकारी युद्धपातळीवर कामाला लागले. या सर्व प्रकारामुळं ख्रिसमस सुटीच्या ऐन हंगामात हे हॉटेल बंद झालं. रुममध्ये राहणाºया अनेक उच्चभ्रू पर्यटकांना सामानासह बाहेर पडावं लागलं.
विशेष म्हणजे, एकेकाळी याच महाबळेश्वरचे नगराध्यक्ष राहिलेल्या डी. एम. बावळेकर या शिवसेना नेत्यालाही हॉटेलमधील बांधकाम बेकायदेशीर असल्याचा साक्षात्कार नुकताच झाला. आता हे बांधकाम पाडून टाकण्यासाठीही हालचाली सुरू झाल्या... हे सारं घडलं, केवळ ठाकरे कुटुंबीयांच्या कानाला त्रास झाल्यामुळं. खरंच, उद्धवा... अजब तुमचे कान !
‘कोण उद्धव’ प्रश्नामुळे इगो अधिकच भडकला...
वरातीत नाचणाºया मंडळींना गाणं बंद करण्याचा आदेश देणाºया अधिकाºयांनी ‘शेजारी मुक्कामी उतरलेल्या उद्धव साहेबांना त्रास होतोय. ताबडतोब गाणं बंद करा,’ असं सांगितलं. तेव्हा वरातीतील एका नागपुरी कार्यकर्त्यानं अस्सल वैदर्भीय भाषेत ‘कोण उद्धव ?’ असा तिरकस सवाल केला. यानंतर तर अत्यंत छोटा विषय भलताच वाढला. इगोही अधिकच भडकला. नंतर त्याचा फटका हॉटेल चालकाला बसला. ऐन सिझनमध्ये पन्नासपेक्षाही अधिक उच्चभ्रू पर्यटकांना हॉटेलच्या रुम्समधून बाहेर काढण्याची कारवाई केली गेली.

Web Title: Uthavana Kanthalya ... Hotel Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.