साताºयाच्या तरुणाची ‘यू-ट्यूबगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 11:22 PM2017-11-05T23:22:53+5:302017-11-05T23:26:47+5:30

'U-tubagiri' for the youth of Sata | साताºयाच्या तरुणाची ‘यू-ट्यूबगिरी’

साताºयाच्या तरुणाची ‘यू-ट्यूबगिरी’

googlenewsNext


सातारा : काळजाचा थरकाप उडविणारा सह्याद्रीचा घाटमाथा अन् डोंगरदºया. थंड हवेचे महाबळेश्वर, पाचगणी असो वा स्वराज्याचे साक्षीदार ठरलेले अजिंक्यतारा, वासोटा, प्रतापगड. यांचा जगभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले. यातील बहुतांश ठिकाणं जगभरातील पर्यटकांच्या मोबाईलवर अधिराज्य गाजवत आहेत. ही किमया घडली ती साताºयातील जीवन कदम यांच्या ‘यू-ट्यूबगिरी’मुळे.
जीवन कदम यांचे मूळगाव कोरेगाव तालुक्यातील चंचळी. त्यांचे शिक्षण साताºयातच झाले. आई अंगणवाडी शिक्षिकातर वडील मुंबईतल्या मिल बंद झाल्यामुळे गावाकडे येऊन वॉचमनचे काम करत. परिस्थितीशी झगडत जीवन कदम यांनी जिद्दीने संगणक क्षेत्रातील पदवी मिळविली. येथेच न थांबता पुढील उच्च शिक्षणासाठी मुंबई गाठली. कष्टाचं चीज झालं. नोकरी लागली. लग्न झालं; पण एवढ्यावर न थांबता इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करण्याचा निर्णय घेतला. अन् येथूनच यू-ट्यूबसारखं प्रभावी माध्यम कामी आलं.
‘जीवन कदम वलोग्स’ या मराठी यू-ट्यूब जगतातील नवीन पर्वाला सुरुवात झाली. निसर्गानं दहाही हातांनी दिलेली निसर्ग संपदा दिमतीला होती. यालाच भांडवल करत यू-ट्यूबसाठी लागणारा संगणक आणि कॅमेरा खरेदी केला. एकेदिवशी सर्वजण फिरायला तापोळा गेले. तेथे सहज चित्रीकरण केले. त्याला मराठी भाषेत आवाज दिला. चित्रीकरण यू-ट्यूबवर अपलोड केले अन् चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून आत्मविश्वास वाढला अन् चित्रीकरणाची मालिका सुरू झाली ती थांबण्याचं नावच घेत नाही.
हे सर्व करताना समजले की, अशा प्रकारे मराठीत व्हिडिओ ब्लॉगिंग दुसरे कोणीच बनवत नाहीत. महाराष्ट्रातील संस्कृती, सह्याद्रीच्या कुशीतील सौंदर्य आणि गड किल्ल्यांचा इतिहास या माध्यमातून जगभरात पोहोचवला तर ही छोटीशी सेवा घडू शकते.
पाश्चिमात्य संगीताचा तडका
लोकांना घरबसल्या राज्यातील ठिकाणांची तसेच गडांची माहितीपूर्ण भ्रमंती ही सिनेमॅटिक इफेक्टमध्ये. त्याला एक पाश्चिमात्य संगीताचा तडका दिला. यामुळे तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळू लागला.
यांचे झालेले चित्रीकरण
वासोटा
कास
श्रमदान अन्नदात्यासाठी
(पाणी फाउंडेशन)
रानफुलं हरिश्चंद्र गड

Web Title: 'U-tubagiri' for the youth of Sata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.