कोयना धरणात दोन टीएमसीने वाढ, पाणीसाठा ४३ वर; जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:06 PM2018-07-09T13:06:14+5:302018-07-09T13:07:35+5:30

कोयना धरणात पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर मंदावला आहे. शनिवार, रविवारी झालेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणात ४३. ७० टीएमसी पाणीसाठा झाला. अवघ्या सोळा तासांत दोन टीएमसीने भर पडली.

Two TMC increase in Koyna dam, water stock at 43; The rain deficiency in the district has slowed down | कोयना धरणात दोन टीएमसीने वाढ, पाणीसाठा ४३ वर; जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

कोयना धरणात दोन टीएमसीने वाढ, पाणीसाठा ४३ वर; जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Next
ठळक मुद्देकोयना धरणात दोन टीएमसीने वाढ, पाणीसाठा ४३ वर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

सातारा : कोयना धरणात पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर मंदावला आहे. शनिवार, रविवारी झालेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणात ४३. ७० टीएमसी पाणीसाठा झाला. अवघ्या सोळा तासांत दोन टीएमसीने भर पडली.

सातारा जिल्ह्यात जून महिन्यात खूपच तुरळक पाऊस झाला. त्यानंतर पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सातारा, पाटण, महाबळेश्वर, कोयना, नवजा परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

सोमवारी सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत कोयना येथे ९२, नवजा तेथे ७३ तर महाबळेश्वरमध्ये ८६ मिलीमीटर पाऊस पडला. कोयना धरणात पाण्याची २४,२१४ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणात ४३.७० टीएमसी पाणीसाठा झाला. गेल्यावर्षी याच दिवशी ३७.७६ टीएमसी पाणीसाठा होता.

Web Title: Two TMC increase in Koyna dam, water stock at 43; The rain deficiency in the district has slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.