पावसाचा जोर मंदावला, सावरणे सुरू, ठाणे जिल्हा पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 06:13 AM2018-07-09T06:13:27+5:302018-07-09T06:13:50+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून विस्कळीत झालेले जनजीवन रविवारी रुळांवर येताना दिसले.

 Rainfall was slowed down, resumption began | पावसाचा जोर मंदावला, सावरणे सुरू, ठाणे जिल्हा पूर्वपदावर

पावसाचा जोर मंदावला, सावरणे सुरू, ठाणे जिल्हा पूर्वपदावर

Next

ठाणे - जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून विस्कळीत झालेले जनजीवन रविवारी रुळांवर येताना दिसले. नदीनाल्यांच्या किनारी असणाऱ्या गावांतील काही घरांत पाणी शिरले होते, ते पाणी ओसरले. मात्र, त्यात अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकºयांनी पेरणी केलेली पिके लागवडीसाठी आलेली असताना जोरदार पावसात वाहून गेली.
रविवारी दिवसभर जिल्ह्यात ठिकठिकाणी कमीअधिक पाऊस पडला असून मागील २४ तासांत सरासरी १७९.३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर ११ जुलैपर्यंत कायम राहणार असून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
ठाणे शहरात रविवारी भिंत कोसळल्याची माहिती असून वंदना टॉकीजसमोर व अन्य ठिकाणी १० झाडे उन्मळून पडलीत. जिल्ह्यातील नद्यांचा पूर ओसरला असून परिसरातील चिखलामुळे आजार वाढण्याचे भय वाढले आहे.

अंबरनाथ पूर्वपदावर
अंबरनाथ : पावसाचा जोर कमी झाल्याने रविवारी जनजीवन पूर्ववत झाले आहे. अंबरनाथमधील अनेक सखल भागांत पाणी शिरल्याने लोकांच्या घरांचे नुकसान झाले होते. नागरिकांनी आपापल्या घरांतील सामानाची आवराआवर सुरू केली असून संसारोपयोगी वस्तू नव्याने मांडण्याचे काम सुरू केले आहे. नाल्याचे पाणी रस्त्यांवर आल्याने चिखलाचा थर तयार झाला आहे.

भिवंडीतील मार्केटमध्ये सफाई

भिवंडी : शहरात मुसळधार पावसाने धुडगूस घातल्यानंतर रविवारी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे तीनबत्ती, शिवाजीनगर व ठाणगेआळी मार्केटच्या ठिकाणी साचलेल्या घाणीमुळे परिसरात रोगराई पसरू नये, म्हणून आरोग्य व स्वच्छता विभागाने मार्केटमध्ये स्वच्छतेस सुरुवात केली.

अतिवृष्टीमुळे खाडीचे व नाल्याचे पाणी मार्केटमध्ये शिरले होते. भाजीपाला पाण्यात वाहून गेला. तो भाजीपाला जवळच असलेल्या पालिकेच्या जागेवर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. दुर्गंधीने हैराण झालेल्या नागरिकांनी पालिकेच्या आरोग्य उपायुक्तांकडे तक्रार केल्यानंतर दुपारनंतर स्वच्छता सुरू करण्यात आली. कचरा उचलल्यानंतर रोगराई पसरू नये, म्हणून जंतुनाशके फवारण्याची मागणी नागरिकांना केली.

उल्हास नदीकिनारी असणाºयांचा धोका टळला
बदलापूर : मुसळधार पावसाने उल्हास नदी भरून वाहत राहिल्याने नदीकिनारी असलेल्या गावांना धोका निर्माण झाला होता. मात्र, रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने हा धोका टळला आहे.

Web Title:  Rainfall was slowed down, resumption began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.