सोनगाव येथे दोन गटांत तुंबळ मारामारी, सहाजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 10:59 AM2019-04-27T10:59:29+5:302019-04-27T11:00:47+5:30

तीन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणातून सोनगाव सं. निंब येथे दोन गटांत कोयता, कुºहाड, खुरपे, लाकडी दांडके याचा वापर करत तुंबळ मारामारी झाली. यामध्ये सहाजण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Two groups have been injured in the violence in Sonegaon, six seriously injured | सोनगाव येथे दोन गटांत तुंबळ मारामारी, सहाजण गंभीर जखमी

सोनगाव येथे दोन गटांत तुंबळ मारामारी, सहाजण गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देसोनगाव येथे दोन गटांत तुंबळ मारामारी, सहाजण गंभीर जखमीपरस्पर तक्रारीवरून १९ जणांवर गुन्हा ; तीन वर्षांपूर्वीचा वाद उफळला

सातारा : तीन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणातून सोनगाव सं. निंब येथे दोन गटांत कोयता, कुºहाड, खुरपे, लाकडी दांडके याचा वापर करत तुंबळ मारामारी झाली. यामध्ये सहाजण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अजय विजय शिंदे (वय २३, रा. सोनगाव सं. निंब. पो. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) हा या वादावादीत गंभीर जखमी झाला असून, त्याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, तीन वर्षांपूर्वी झालेल्या वादातून अजित धनाजी शिंदे, रणजित धनाजी शिंदे, धनाजी अर्जुन शिंदे यांनी हातात कुऱ्हाड, कोयता, खुरपे व लाकडी दांडके घेऊन दि. २५ रोजी रात्री साडेआठ वाजता माझ्यावर हल्ला केला.

तसेच विजय मारूती शिंदे, गणेश कदम, विकास मोहन कदम, मोहन रामचंद्र कदम यांच्या डोक्यात, कानावर, हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तर सावित्री धनाजी शिंदे हिने वरील संशयितांना कोयता, कुऱ्हाड, खुरपे, लाकडी दांडके आदी साहित्य देऊन संबंधितांना मारहाण करण्यास प्रवृत्त केले. यावरून अजित शिंदे, रणजित शिंदे, धनाजी शिंदे, सावित्री शिंदे (सर्व रा. सोनगाव तर्फे सं. लिंब, सातारा) यांच्यावर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

अजित धनाजी शिंदे (वय ३२, रा. सोनगाव सं. निंब ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामध्ये गणेश दामन कदम, अजय विजय शिंदे, मिराबाई शिंदे, विकास मोहन कदम, विनोद अजय शिंदे, प्रेमा मोहन कदम, तुळशीराम रामचंद्र शिंदे, विजय रामचंद्र शिंदे, प्रवीण रामचंद्र कदम, मोहन कदम (सर्व रा. माहुली सोनगाव, निंब सातारा) यांच्यासह अन्य पाचजणांचा समावेश आहे.

जुन्या भांडणाच्या कारणावरून अजित शिंदे यांना गणेश कदम आणि अजय शिंदे यांनी बेदम मारहाण केली. तर मिराबाई शिंदे हिने अजितच्या तोंडावर दगड मारला. तसेच तुळशीराम शिंदेनेही अजितच्या डाव्या बाजूच्या कानाजवळ दगड मारला. हा वाद सोडविण्यासाठी अजितचे वडील धनाजी शिंदे आले असता मोहन कदमने त्यांच्या डोक्यात कोयता मारला. भाऊ रणजित यास विजय शिंदेने काठीने डोक्यात मारले. दरम्यान, या मारामारी प्रकरणी पोलिसांनी पाच ते सहाजणांना ताब्यात घेतले आहे.

 

Web Title: Two groups have been injured in the violence in Sonegaon, six seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.