दिसला ट्रॅक्टर की कर हात; दिसली चेसी की लाव स्टिकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:41 PM2018-01-03T23:41:39+5:302018-01-03T23:42:12+5:30

 Tractor trunk; Choice of Lava sticker | दिसला ट्रॅक्टर की कर हात; दिसली चेसी की लाव स्टिकर

दिसला ट्रॅक्टर की कर हात; दिसली चेसी की लाव स्टिकर

Next


सातारा : सातारा शहरालगतच्या राष्टÑीय महामार्गावर गेल्या दोन दिवसांपासून वेगळंच दृश्य दिसतंय. ‘दिसला ट्रॅक्टर की कर हात... खाली वाकल्यानंतर दिसली चेसी की लाव स्टिकर,’ अशी मोहीम कार्यकर्त्यांकडून अत्यंत नियोजनबद्धरीत्या राबविली जातेय. ‘लोकमत’च्या पुढाकारातून वात्सल्य अन् धर्मवीर या दोन संस्थांचे कार्यकर्ते ऊस वाहतूक करणाºया प्रत्येक ट्रॅक्टर-ट्रॉलीजला लाल रेडियम लावण्यात गुंतलेत.
पहिल्या दिवशी जवळपास दोनशेपेक्षा अधिक ट्रॅक्टर-ट्रॉलीज्ना रेडियम लावण्यात आले होते. दुसºया दिवशी म्हणजे बुधवारी हायवे परिसरातील जवळपास तीनशे ट्रॅक्टर-ट्रॉलीज् थांबवून त्यांनाही लाल पट्टी चिकटविण्यात कार्यकर्त्यांना यश आले. गेल्या दोन दिवसांतील आकडा जवळपास पाचशे इतका गेला असून, पुढील टप्प्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इतर उत्साही कार्यकर्त्यांचा सहभाग या मोहिमेत वाढविला जाणार आहे.
वात्सल्य सामाजिक सेवा संस्था अन् धर्मवीर युवा मंचचे कार्यकर्ते मोफत रेडियम पुरवित असून, जिल्ह्यातील बहुतांश ट्रॅक्टर-ट्रॉलीजला् स्वत:हून लाल स्टिकर लावण्यावर भर दिला जात आहे. या ट्रॅक्टर-ट्रॉलीज्ना रिफ्लेक्टर नसल्यामुळे पाठीमागून आदळणाºया वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले होते. हे अपघात टाळण्यासाठी ‘लोकमत’च्या पुढाकारातून या दोन संस्थांनी ही मोहीम राबविली आहे. वाहनांना रेडियम नसल्याने अनेकवेळा वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत असते. ट्रॅक्टर-ट्रॉलीला रेडियम लावल्याने पोलिसांकडून होणाºया कारवाईतून सुटका होणार आहे.
तुम्हीही उतरू शकता या मोहिमेत..
सातारकरांचे प्राण वाचविण्यासाठी सुरू केलेल्या या सामाजिक मोहिमेत तुम्हीही उतरू शकता. तुमची संस्था अथवा संघटना असेल तर साधा संपर्क. आपल्याला दिले जातील मोफत रेडियम, स्टिकर. आपणही लावू शकता गावोगावच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीज्ना हे रेडियम.. अन् वाचवू शकता लोकांचे प्राण. विशेष म्हणजे आपल्या या सामाजिक उपक्रमाचे छायाचित्रही ‘लोकमत’मध्ये केले जाईल प्रसिध्द. मग विचार कसला करताय ‘उचला मोबाईल... करा कॉल.’ 9850 384 376

Web Title:  Tractor trunk; Choice of Lava sticker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.