पर्यटकांच्या आवडत्या गावातली मंडळीच गेली पर्यटनाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:03 AM2017-07-27T00:03:34+5:302017-07-27T00:07:05+5:30

सातारा : जगभरातील लाखो पर्यटक जागतिक दर्जाचं पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर भेटी देऊन येथील पर्यटनाचा आनंद लुटतात. मात्र, महाबळेश्वरवासीय देखील पर्यटनप्रेमी आहेत.

The tourists' favorite villages were visited by tourists! | पर्यटकांच्या आवडत्या गावातली मंडळीच गेली पर्यटनाला !

पर्यटकांच्या आवडत्या गावातली मंडळीच गेली पर्यटनाला !

Next
ठळक मुद्दे♦ पाचगणीला दरवर्षी सुमारे दहा लाखांहून अधिक पर्यटक ♦ काहीजण वारासणी, शिमला, कुल्लू मनाली, उटी, म्हैसूर या स्थळांना भेटी♦स्थानिक नागरिकही सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर

सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जगभरातील लाखो पर्यटक जागतिक दर्जाचं पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर भेटी देऊन येथील पर्यटनाचा आनंद लुटतात. मात्र, महाबळेश्वरवासीय देखील पर्यटनप्रेमी आहेत. येथील स्थानिक नागरिक फिरायला कुठे जातातं? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. सध्या पर्यटनाचा हंगाम मंदावल्याने महाबळेश्वरवासीय तिरूपती, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर अन् अष्टविनायकाच्या दर्शनाला घराबाहेर पडले असून युवावर्गाचे कोकण, गोवा हे आवडते ‘डेस्टीनेशन’ आहे.
महाराष्ट्राची चेरापुंजी, थंड हवेचे ठिकाण आणि स्ट्रॉबेरी लॅण्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीला दरवर्षी सुमारे दहा लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. उन्हाळ्यात व दिवाळीत याठिकाणी पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहते. मात्र, पावसाळ्यात पर्यटकांना हंगाम पूर्णपणे ओसरतो.
देशी-विदेशी पर्यटक ज्याप्रमाणे पर्यटनासाठी महाबळेश्वरला येतात त्याचप्रमाणे महाबळेश्वरवासीय देखील ‘पर्यटक’ आहेत. पावसाळा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकही सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. तिरूपती, शिर्डी, अष्टविनायक, शनी शिंगणापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर ही स्थानिक नागरिकांची आवडती ठिकाणे असून अनेकजण याठिकाणी देवदर्शनासाठी जात आहेत. युवा वर्गाचे कोकण, गोवा हे आवडते पर्यटनस्थळ असून युवक मोठ्या संख्येने ‘ट्रीप’चे आयोजन करून कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.


केरळ, वाराणसीलाही पसंती
महाबळेश्वरचा पाऊस पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. मात्र, स्थानिकांना या पावसाचा अपु्रव वाटत नाही. त्यामुळे अनेक हौशी नागरिक केरळच्या वैविध्यपूर्ण पावसाची मजा लुटण्यासाठी केरळला भेट देऊन पर्यटनाची सैर करीत आहेत. तर काहीजण वारासणी, शिमला, कुल्लू मनाली, उटी, म्हैसूर या स्थळांना भेटी देत आहेत.

कर्मचाºयांची पावसाळी सुटी फक्त कुटुंबासोबत
महाबळेश्वर, पाचगणीतील हॉटेलची संख्या हजारोंच्या घरात आहे. ग्रामीण भागातील अनेक युवक या हॉटेल्समध्ये काम करतात. पावसामुळे बहुतांश हॉटेल बंद झाल्याने कर्मचाºयांनाही ‘पावसाळी सुटी’ मिळली आहे. वर्षातून एकदाच सलग दीड-दोन महिने सुटी मिळत असल्याने कर्मचारी आपल्या कुटुंबियांसमवेत सुटीचा आनंद लुट आहेत.

पावसाळ्यात महाबळेश्वरला येणाºया पर्यटकांची संख्या अत्यल्प असते. त्यामुळे अनेक हॉटेल्स व व्यवसाय बंद असतात. या कालावधीत आम्ही दरवर्षी फॅमिली ट्रीपचे आयोजन करतो. यंदा कोकणाच्या निसर्गसौंदर्यांचा आनंद लुटला तर गोव्याचा अल्याददायक वातावरणाचाही.
- प्रमोद जेधे, स्थानिक नागरिक

देवदर्शन
बालाजी, तुळजापूर, कोल्हापूर, अष्टविनायक, शिर्डी, पंढरपूर, शनी शिंगणापूर

रोप वे...
वारासणी, उटी, म्हैसूर, कुल्लू मनाली, केरळ, शिमला

सागर किनारा
कोकण,
गोवा,
हैद्राबाद

Web Title: The tourists' favorite villages were visited by tourists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.