Three ambulances stuck in the traffic congestion at Mallacpur | मलकापुरात वाहतूक कोंडीत अडकल्या तीन रुग्णवाहिका
मलकापुरात वाहतूक कोंडीत अडकल्या तीन रुग्णवाहिका

ठळक मुद्देउपमार्गावरील पार्किंगमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष 

मलकापूर : मलकापूर येथील उपमार्गासह उड्डाणपुलाखाली होणाºया अस्ताव्यस्त पार्किंगमुळे येथील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीत एकाचवेळी तीन रुग्णवाहिका वीस मिनिटे अडकून पडल्या. या परिसरात वाहतूक कोंडी होण्याचा नित्याचाच प्रकार झाला असून, वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सोमवारी पुलाखाली व दोन्हीही उपमार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यावेळी कºहाडकडून व मलकापूरकडून कृष्णा रुग्णालयात जाणाºया दोन व कृष्णा रुग्णालयातून इतरत्र जाणारी एक रुग्णवाहिका किमान वीस मिनिटे अडकून पडली होती. या परिसरात अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होण्याचा नित्याचाच प्रकार बनला आहे. अशावेळी दोन मिनिटांच्या प्रवासाला हकनाक अर्धा-अर्धा तास घालवावा लागातो. या गंभीर प्रश्नाची दखल घेण्यात वाहतूक पोलीस हेतू परस्पर दुर्लक्ष करत आहेत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहेत.


Web Title: Three ambulances stuck in the traffic congestion at Mallacpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.