मॅग्नेट ते दगडावरून चालणं -ट्रिटमेंटपाथचा लळा । आयुर्वेदिक गार्डनचे सातारकरांना आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 01:07 AM2019-06-23T01:07:56+5:302019-06-23T01:08:38+5:30

घरातून बाहेर पडताच गाडीला किक मारायची... तेथून आॅफिस अन् पुन्हा गाडीवरून घरी यायचं... आधुनिकतेमुळे व्यायाम कमी झाला, अन् आजारी पडल्यावर लाखो रुपये खर्च करत राहतो. यावरच मात करण्यासाठी सातारा पालिकेने गोडोलीत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन साकारले आहे.

Take the moving path from the Magnet to the stone. Ayurvedic Garden's Satarkar Attractions | मॅग्नेट ते दगडावरून चालणं -ट्रिटमेंटपाथचा लळा । आयुर्वेदिक गार्डनचे सातारकरांना आकर्षण

अहा हा हाऽऽ : गोडोलीत नव्याने तयार झालेल्या सातारा पालिकेच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डनमध्ये प्रवेश करताच मॅग्नेट पाथ लागतो. तळपायाला टोचणाऱ्या या मार्गावर पाय ठेवताच डोक्यात चेतनाच जागृत होते. अन् तोंडातून ‘अहा हा हाऽऽ’ उच्चार बाहेर येतात.

googlenewsNext

जगदीश कोष्टी ।

सातारा : घरातून बाहेर पडताच गाडीला किक मारायची... तेथून आॅफिस अन् पुन्हा गाडीवरून घरी यायचं... आधुनिकतेमुळे व्यायाम कमी झाला, अन् आजारी पडल्यावर लाखो रुपये खर्च करत राहतो. यावरच मात करण्यासाठी सातारा पालिकेने गोडोलीत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन साकारले आहे. त्यातील ट्रिटमेंट पाथचा हजारो सातारकर दररोज वापर करत आहेत.

पंजाबमधील सुनाम शहरातील हौसिंग गार्डनपासून प्रेरणा घेऊन साडेतीन एकर जागेत नावीन्यपूर्ण आयुर्वेदिक गार्डन तयार केले आहे. या ठिकाणी २३५ मीटर लांबीचा चालण्यासाठी पेव्हर पाथ-वे बनविला आहे. यावरून असंख्य मंडळी चालत असतात.

याशिवाय या गार्डनमध्ये विविध व्याधींचे निवारण करणारे आठ ट्रिटमेंट पाथ-वे बनवले आहेत. याचं सध्या सर्वांना आकर्षण आहे. सर्वात प्रथम मॅग्नेटिक पाथ लागतो. मॅटलाच उच्च शक्तीचे मॅग्नेट बसविले आहते. शरीर जैव विद्युत तरंगांच्या माध्यमातून कार्य करते.

ग्रास पाथवरील हिरवळीवर चालल्याने चेता संस्था सक्रिय होते. आॅप्टिक नर्व्ह क्रियाशील होऊन दृष्टी सुधारते. रक्तदाब कमी होऊन तणावमुक्त ठेवण्यास मदत करतो. पुढे अ‍ॅक्युप्रेशर पाथमध्ये खडीवरून चालल्याने शरीरातील १०८ ऊर्जा बिंदूवर दाब पडून ते क्रियाशील होतात. गुडघेदुखी, कंबरदुखींपासून सुटका होऊन स्थूलता कमी होते, असे शास्त्र सांगते. दगडधोंड्यातून लहान मुलं अनवाणी सहज चालतात; पण मोठ्यांना सवय नसल्यानं हा पथ कधी संपतो, असे वाटते. सँड पाथ समुद्री वाळूच्या कणांपासून तयार करण्यात आला असून, या वाळूत रेडियम असते. त्यावर चालण्याने शरीरातील विषारी द्र्रव्ये बाहेर टाकण्याची प्रक्रिया जलद होते.

लहान मुलांना प्रवेश बंदी...
या ट्रॅकवरून चालण्याने शरीरातील अनेक इंद्रिये सक्रिय होतात. त्यामुळे या ट्रॅकवरून केवळ चौदा वर्षांवरील व्यक्तींनाच सोडले जाते. ही बाग सकाळी व सायंकाळी उघडी असते. त्यामुळे दररोज सरासरी दीड ते दोन हजार सातारकर वापर करत आहेत. एकदा गेल्यावर चांगला अनुभव येत असल्याने गेल्या उन्हाळी सुटीत ही बाग चांगलीच फुललेली पाहायला मिळाली.

केवळ चालण्याने व्याधी दूर
क्रिस्टल पाथमुळे सकारात्मक ऊर्जा शोषली जाऊन आराम मिळतो. हायड्रो पाथमुळे शारीरिक व मानसिक ताण दूर होऊन स्फूर्ती मिळते. अ‍ॅरोमा पाथमुळे सकारात्मकता निर्माण होऊन उत्साह संचारतो. मन ताजेतवाणे व आनंदी राहते. मड पाथमुळे शरीरातील संपूर्ण विष शोषून मानसिक शीतलतेचा अनुभव येतो. यामुळे मनही शांत होत असल्याचा अनुभव येतो.


 

Web Title: Take the moving path from the Magnet to the stone. Ayurvedic Garden's Satarkar Attractions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.